शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

कामचुकारांवर कारवाई अटळ! - ऊर्जामंत्री बावनकुळे

By admin | Updated: May 19, 2017 01:01 IST

उपअभियंता, दोन शाखा अभियंत्यांना कारणे दाखवा नोटिस

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जे अधिकारी कामचुकारपणा करतील, त्यांच्यावर निश्चितपणे कठोर कारवाई केली जाईल, असे प्रतिपादन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत उर्जामंत्री बावनकुळे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, महावितरणमधील अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य जाणून त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पाडणे अपेक्षित आहे. जे अधिकारी यात कमी पडतील, त्यांच्या थेट ‘सीआर’वर त्याचा परिणाम होणार आहे. यात शासन कुठलीच हयगय करणार नाही. जिल्ह्यात आगामी वर्षभरात ९० कोटी रुपये खर्चून पारेषणला मजबूत करायचे असून १५० कोटी रुपये खर्चून दीड वर्षांत महावितरणला मजबूती देण्याचे शासनाने धोरण आखले आहे. २०२५ पर्यंत जिल्हा विजेच्या बाबतीत परिपूर्ण होईल, या दिशेने ठोस पावले उचलली जातील. वीज चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.पत्रकार परिषदेला खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, माजी आमदार विजयराव जाधव, महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर, जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी, अधीक्षक अभियंता विनोद बेथारीया, अनिल डोये, राकेश जनबंधू आदी उपस्थित होते. गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा दौऱ्यावर असलेल्या ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी गुरूवारी सकाळी ११ पासून दुपारी २.३० पर्यंत महावितरणच्या मुख्य कार्यालयात जनता दरबार घेतला. त्यात शेतकऱ्यांसह महावितरणच्या सर्वसामान्य ग्राहकांच्या तक्रारी, अडचणी जाणून घेत त्याचे निवारण केले.महावितरणचे उपअभियंता अतूल देवकर यांच्यासह शाखा अभियंता पवन टिकार, मेताम आणि लिपीक सतीश बिर्ले यांना कामात दिरंगाई केल्याप्रकरणी ‘कारणे दाखवा’ नोटिस बजावण्यात आली. संयुक्तिक कारण न दर्शविल्यास संबंधितांची इतर जिल्ह्यात तडकाफडकी बदली करण्यात यावी, असे निर्देशही ऊर्जामंत्र्यांनी कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांना दिले.