सदर काम सुरू होऊन जवळपास दोन वर्षे होत असून सुद्धा सदर बांधकाम पूर्ण होत नसल्याने याबाबत नगरपंचायतच्या बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदाराला ३ मार्च २०१९ व १९ सप्टेंबर २०२० ला एक नोटीस दिली होती. त्या दोन्ही नोटिसीला सुद्धा संबंधित कंत्राटदाराने राजकीय पाठबळाच्या जोरावर नगरपंचायतला कोणतेही उत्तर न देता केराची टोपली दाखविली . तरीसुद्धा नगरपंचायत बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदाराला विरुद्ध अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्याने नगरपंचायतच्या बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे सदर बांधकाम कोणत्याही अभियंत्यांमार्फत वा प्रगत कारागीर मार्फत न मजुरांकडून अत्यंत थातूरमातूर व निकृष्ट दर्जाचे हाेत आहे. कामातही अनियमितता आहे. सदर कामाचे निष्पक्ष चौकशी व्हावी व सदर काम पाडून नव्याने सुरू करावे व सदर कामाची खर्च संबंधित कंत्राटदाराकडून नुकसान भरपाई म्हणून घ्यावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे
020921\5440img_20210902_143314.jpg
रखडले