शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

भूमिपूजन फलकावरून महिला लोकप्रतिनिधी गायब

By admin | Updated: December 8, 2015 02:26 IST

महिला लोकप्रतिनिधींची सा.बां. विरोधात तक्रार.

मालेगाव: प्रत्येक क्षेत्रात महिलांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा देण्यासाठी न्यायालय व सरकारचा प्रयत्न सुरू असताना, स्थानिक पातळीवर काही विभागांकडून मात्र महिला लोकप्रतिनिधींनाच डावलले जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने एका भूमिपूजन फलकावर पुरुष लोकप्र ितनिधींची नावे आवर्जून टाकली; मात्र दुसर्‍या ठिकाणच्या फलकावर महिला लोकप्रतिनिधींची नावे वगळली. यामुळे संतप्त झालेल्या महिला लोकप्रतिनिधींनी सोमवारी वरिष्ठांकडे तक्रार केली.मालेगाव तालुक्यातील शिरपूर व तिवळी येथे शासनाच्या निधीतून काही दिवसांपूर्वी प्रत्येकी एक असे दोन भूमि पूजन झाले. तिवळी येथे २९ तारखेला मालेगाव, शिरपूर, रिसोड राज्य मार्ग क्रमांक २८८ ची सुधारणा करण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ पार पडला. या कामाचा फलकावर पुरुष लोकप्रतिनिधींची व संबंधित अधिकार्‍यांची नावे आवर्जून टाकण्यात आली. शिरपूर येथेही याच दरम्यान पर्यटन पायाभूत सुविधामधून विविध कामांचे भूमिपूजन झाले. ही सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे केली जात आहेत. शिरपूर येथे विशेषत: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या लोकप्रतिनिधी महिला आहेत; मात्र येथे महिला लोकप्रतिनिधींची नावे फलकावर टाकली नाहीत. या प्रकारामुळे सुरुवातीला महिला लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त संबंधिं तांविरुद्ध कारवाईची मागणी तोंडी स्वरूपात केली होती; मात्र यावर काहीच होत नसल्याचे पाहून महिला लोक प्रतिनिधी संतप्त झाल्या. त्यांनी सोमवारी या प्रकाराची लेखी तक्रार दिली. जि.प. सदस्य शबिना बी इमदाद, पं.स. सदस्या कल्पना विजय अंभोरे, पं.स. सदस्य शिल्पा पंकज देशमुख यांची नावे न टाकल्याने सा.बां. चे 'राजकारण' समोर आले.