शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या बोटांचे ठसे उमटेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 01:27 IST

वाशिम : शासनाच्या कर्जमाफी योजनेसाठी अर्ज करण्यात अनेक अडचणी येत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. आधीच सर्व्हर डाउन, नेट कनेक्टिव्हिटीच्या समस्या असताना, आता अनेक शेतकर्‍यांच्या पत्नीचे ठसेच थम्ब मशीनवर उमटत नसल्याने शेतकरी अर्ज सादर करण्यापासून वंचित राहत असल्याचे चित्र मंगरुळपीर तालुक्यात पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देमंगरुळपीर तालुक्यातील चित्र ऑनलाइन अर्जापासून शेतकरी राहताहेत वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाच्या कर्जमाफी योजनेसाठी अर्ज करण्यात अनेक अडचणी येत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. आधीच सर्व्हर डाउन, नेट कनेक्टिव्हिटीच्या समस्या असताना, आता अनेक शेतकर्‍यांच्या पत्नीचे ठसेच थम्ब मशीनवर उमटत नसल्याने शेतकरी अर्ज सादर करण्यापासून वंचित राहत असल्याचे चित्र मंगरुळपीर तालुक्यात पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शेतकर्‍यांच्या नाकीनऊ येत आहेत. शेतकरी घरी लहान मुलांना सोडून, पत्नीसोबत सेतू केंद्रांवर ताटकळत बसत आहेत. या ठिकाणी नेट कनेक्टिव्हिटी आणि सर्व्हर डाउनची समस्या असल्याने त्यांना दिवसरात्र मुक्काम करावा लागत असून, शेतातील कामे सोडून  सतत अर्जासाठी सेतू केंद्रांच्या वार्‍या कराव्या लागत आहेत.  आता त्यात वेगळीच समस्या उद्भवली असून, अनेक शेतकर्‍यांच्या पत्नीचे ठसेच थम्ब मशीनवर उमटत नसल्याचे प्रकार घडत आहेत. मंगरुळपीर येथील गवळीपुरा परिसरातील तीन महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला. सेतू केंद्रावर या महिला अर्ज सादर करण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या बोटाचे ठसे घेण्याचा प्रयत्न सेतू केंद्र संचालकाने केला; परंतु मशीनवर बोटांचे ठसेच उमटत नसल्याचे दिसले. वारंवार प्रयत्न करूनही त्याला यश आले नाही. अखेर या महिलांना निराश होऊन घरी परतावे लागले. असाच प्रकार रविवारी मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथेही पाहायला मिळाला. जवळपास आठ ते दहा शेतकरी महिलांना या समस्येचा सामना करावा लागला.  ग्रामपंचायतमधील संगणक परिचालकाने या महिलांच्या बोटाचे ठसे अदलून बदलून तपासून पाहिले; परंतु काहीच फायदा झाला नाही. विशेष म्हणजे या ठिकाणी एकाही पुरुषाच्या बोटाचे ठसे न उमटल्याचा प्रकार घडला नाही. सतत काम केल्याने बोटाच्या रेषा मिटल्याने असे होत नाही ना, अशी शंका या महिलांच्या मनात निर्माण झाली आहे. अशी परिस्थिती कायम राहिल्यास संबंधित शेतकरी कुटुंब कर्जमाफीच्या ऑनलाइन अर्जापासून आणि पर्यायाने कर्जमाफीपासूनही वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. या प्रकरणी शासनाने दखल घेणे आवश्यक आहे.