शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी मोपच्या महिलांचा ‘एल्गार’

By admin | Updated: July 21, 2015 00:52 IST

गावातील दारूविक्री कायमस्वरूपी बंद करण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा.

वाशिम : दारूच्या व्यसनाने कुटुंबाची राखरांगोळी होते. संसार उद्ध्वस्त करणारी ही दारू गावातून हद्दपार करायचीच, असा निर्धार जिल्ह्यातील मोप (ता. रिसोड) येथील महिलांनी केला आहे. गावातील दारूविक्री कायमस्वरूपी बंद करण्यासाठी शेकडो महिलांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात मोपच्या महिलांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच पोलीस प्रशासनाकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे, की मोप येथे देशी दारूचे दुकान आहे. हे दुकान डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ असून, चोहोबाजूंनी दलितबहुल वस्ती आहे. दुकानात लोक दारू पिऊन महिलांना अश्लील शिवीगाळ करतात. त्यामुळे नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे. काही महिलांचे पती कुठलेच काम न करता सायंकाळी दारू पिऊन रात्नभर घरी धिंगाणा घालतात. हे दारूडे घरातील भांडीकुंडी, ज्वारी, बाजरी आदी धान्य बाजारात विकून दारू पितात. त्यामुळे गावातील कित्येक महिलांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. गावातच देशीदारूचे दुकान असल्यामुळे तरुणच नव्हे, शाळकरी मुलेही व्यसनांच्या आहारी जाण्याची दाट शक्यता उद्भवली आहे. दारूच्या व्यसनामुळे गावातील अनेक कर्त्या पुरुषांना अकाली मृत्यूला सामोरे जावे लागले असून, कित्येक तरुणांना गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. मोप या गावातील देशी दारूच्या दुकानामधून परिसरातील मौजे चाकुली, भर, बोरखेडी, आसोला, कुर्‍हा, मांडवा, शेलू खडसे, लोणी बु, लोणी खु. आदी गावांमध्येदेखील देशी दारू पुरविली जाते. त्यामुळे परिसरातील कित्येक खेडी व्यसनाधीन होत आहेत.