शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील सर्व विद्युत उपकेंद्रांची क्षमता वाढविणार - बावनकुळे

By admin | Updated: May 18, 2017 19:43 IST

वाशिम : पुरेसा दाबाने वीज पुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे या सर्व उपकेंद्राची क्षमता ५ एम.व्ही.ए. वरून १० एम.व्ही.ए. करण्यात येणार आहे.

ऑनलाइन लोकमत

वाशिम : जिल्ह्यातील अनेक ३३/११ के.व्ही.ची उपकेंद्रे अतिभारीत झाल्यामुळे वीज जोडण्या प्रलंबित आहेत. तसेच पुरेसा दाबाने वीज पुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे या सर्व उपकेंद्राची क्षमता ५ एम.व्ही.ए. वरून १० एम.व्ही.ए. करण्यात येणार आहे. याकरिता प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात बेलमंडल (ता. कारंजा), आसेगाव पेन (ता. रिसोड) व कुपटा (ता. मानोरा) येथील ३३/११ के.व्ही. विद्युत उपकेंद्रांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी खासदार भावना गवळी, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, माजी आमदार विजयराव जाधव, महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर, अधीक्षक अभियंते विनोद बेथारीया, अनिल डोये, राकेश जनबंधू आदी उपस्थित होते.ना. बावनकुळे म्हणाले की, वाशिम जिल्ह्यातील विद्युत यंत्रणा सक्षमीकरणासाठी १५० कोटी रुपये निधी देण्यात आला असून या निधीतील सर्व कामे पुढील दीड वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. आज दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेतील तीन उपकेंद्राचे भूमिपूजन संपन्न झाले आहे. इन्फ्रा-२ अंतर्गत मंजूर असलेल्या रिसोड तालुक्यातील कुऱ्हा, मालेगाव तालुक्यातील डोंगरकिन्ही या उपकेंद्रांचेही काम लवकरच सुरु होणार आहे. तसेच झोडगा उपकेंद्राचे काम जूनअखेर पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रलंबित वीज जोडण्या, भारनियमनाची समस्या बहुतांशी प्रमाणात निकाली निघणार आहे. विजेचा भार कमी करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना ऊर्जा बचत करणारे विद्युत पंप वापरण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. जुन्या कृषीपंपधारकांना ऊर्जा बचत करणारे पंप घेण्यासाठी महावितरण ५० टक्के अनुदान देईल, असे ऊर्जामंत्री यावेळी म्हणाले.