शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी.मधील ‘वायफाय’ तकलादू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 01:51 IST

वाशिम: एस.टी.ने प्रवास करणार्‍या नागरिकांच्या भ्रमणध्वनीला वायफायची मोफत सुविधा देण्याचा उपक्रम परिवहन महामंडळाने हाती घेतला. त्यानुसार, अकोला विभागातील आगारांमध्ये २६५ बसमध्ये वायफाय इन्स्ट्रूमेंटदेखील बसविण्यात आले; मात्र या अंतर्गत केवळ ठराविक मालिका पाहण्याची सोय करण्यात आली असून, व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर यासारख्या महत्त्वाच्या सुविधांना वगळण्यात आल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. 

ठळक मुद्देप्रवाशांमध्ये नाराजी सुविधा ‘हायटेक ’असण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: एस.टी.ने प्रवास करणार्‍या नागरिकांच्या भ्रमणध्वनीला वायफायची मोफत सुविधा देण्याचा उपक्रम परिवहन महामंडळाने हाती घेतला. त्यानुसार, अकोला विभागातील आगारांमध्ये २६५ बसमध्ये वायफाय इन्स्ट्रूमेंटदेखील बसविण्यात आले; मात्र या अंतर्गत केवळ ठराविक मालिका पाहण्याची सोय करण्यात आली असून, व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर यासारख्या महत्त्वाच्या सुविधांना वगळण्यात आल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. परिवहन महामंडळाच्या एस.टी. बसने नागरिकांनी प्रवास करावा, यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जानेवारी २0१७ पासून टप्प्याटप्प्याने राज्यभरातील बसेसमध्ये वायफाय सुविधा देण्यासाठी पुढाकार घेतला. या अंतर्गत प्रत्येक एस.टी. बसमध्ये वाय-फाय तंत्रज्ञानावर आधारित मनोरंजनाची सेवा प्रवाशांना घेता येईल. त्यासाठी बसमध्ये हॉट स्पॉट बसविला जाईल. त्याद्वारे प्रवाशांना मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपट, मालिका, गाणी, काटरून्स मोबाइलवर पाहता येतील, असे जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र अकोला विभागातील सर्वच बसेसमध्ये वायफायच्या माध्यमातून केवळ ‘वुट गो डॉट कॉम’ या वेबसाईटवर गेल्यानंतर तीन ते चार मराठी चित्रपट, काही हिंदी मालिका आणि दूरचित्रवाहिन्यांवरील निवडक मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहता येणे शक्य होत आहे. विशेष म्हणजे म्हणायला ‘वायफाय’ची सुविधा आहे; पण याअंतर्गत मोबाइलमधील व्हॉट्सअपदेखील सुरू ठेवण्याची सोय नसल्याने ही सुविधा बहुतांशी तकलादू ठरत असल्याचे दिसून येत आहे. 

अकोला विभागातील आगारांतर्गत २६५ एस.टी.बसेसमध्ये वायफायची सुविधा पुरविण्यात आली आहे. याअंतर्गत मोबाइलवर सुरूवातीच्या टप्प्यात कमी प्रमाणात कार्यक्रम दिसत असले तरी भविष्यात त्यात निश्‍चितपणे सुधारणा केल्या जातील.- अमोल पलिंगे, विभाग नियंत्रक, एस.टी.परिवहन महामंडळ, अकोला

एस.टी.बसमध्ये वायफायची सुविधा मिळणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर खरे तर आनंद झाला होता. प्रत्यक्षात मात्र ही सुविधा अगदीच कमकुवत ठरत असून, ठराविक आणि तेच ते कार्यक्रम पाहण्याची सुविधा या अंतर्गत देण्यात आल्याने याबाबत नाराजी आहे. - प्रवीण गोटे, प्रवासी, वाशिम

मी दैनंदिन एस.टी.ने मंगरूळपीर-वाशिम प्रवास करतो. मोबाइलमध्ये एस.टी.चे वायफाय अँक्टिव्हेट केलेले आहे; परंतु ते कामचलावू असून, परिवहन महामंडळाने यात सुधारणा करायला हव्या.- संतोष पवार, प्रवासी, मंगरूळपीर