शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या अपघाती निधनानंतर पत्नीचाही मृत्यू!

By admin | Updated: June 2, 2017 01:28 IST

चार चिमुकल्या मुलांचे छत्र हरविले : २८ मे रोजी झाला होता अपघात

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : मेहकर-रिसोड मार्गावर २८ मे रोजी घडलेल्या अपघातात चंद्रकांत राठोड (रा.जवळा) यांचा मृत्यू झाला होता; तर गंभीर जखमी झालेल्या बेबी राठोड यांचा औरंगाबाद येथे बुधवार, ३१ मे रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे त्यांची चारही मुले उघड्यावर आली असून, गावावरही शोककळा पसरली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की चंद्रकांत राठोड आणि त्यांची पत्नी बेबी राठोड हे दोघे २८ मे रोजी आपल्या दुचाकीने विवाह सोहळ्यावरून परत गावी येत असताना रात्री ९ वाजेच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने दुचाकीस जबर धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर रिसोड ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून औरंगाबादच्या रुग्णालयाकडे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले; परंतु चंद्रकांत राठोड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आणि डोक्यातून सतत रक्तस्राव झाल्यामुळे त्यांची वाटेतच प्राणज्योत मालवली. दरम्यान, चंद्रकांत राठोड यांच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर किमान बेबी राठोड यांचा तरी प्राण वाचावा, अशी अपेक्षा जवळा येथील समस्त गावकऱ्यांमध्ये व्यक्त होत होती; मात्र औरंगाबाद येथे उपचार सुरू असतानाच त्यांचेही ३१ मे रोजी निधन झाले. या दुर्दैवी घटनेमुळे वडिलांच्या पाठोपाठ आईचेही छत्र हरविल्यामुळे चारही मुले पोरकी झाली आहेत. दरम्यान, बेबी राठोड यांच्या पार्थिव देहावर गुरुवार, १ जून रोजी अत्यंत शोकाकुल वातावरणात जवळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या चारही मुलांचा आक्रोश असह्य करणारा होता.