शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पांचे जल्लोषात स्वागत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:45 IST

पावसाच्या हलक्या सरींसह गणरायांचे वाशिम जिल्हय़ात  शुक्रवारी जल्लोषात स्वागत झाले. ‘गणपतीबाप्पा मोरया, मंगलमू र्ती मोरया’ या घोषणेसह ढोलताशांच्या गजरात मूर्तींची हर्षोल्हासात  प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. रात्री उशिरापर्यंंत जिल्हय़ातील शहरी  भागात २४५ तर ग्रामीण भागात ४४१ अशा एकंदरीत ६८६  सार्वजनिक गणेश मंडळांकडून ‘श्रीं’ची स्थापना करण्यात आली.  यामध्ये २१0 गावांत एक गाव-एक गणपती या उपक्रमाचादेखील  समावेश आहे.

ठळक मुद्दे६८६ सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना ‘गणपती बाप्पां’च्या गजराने शहर दुमदुमले

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: पावसाच्या हलक्या सरींसह गणरायांचे वाशिम जिल्हय़ात  शुक्रवारी जल्लोषात स्वागत झाले. ‘गणपतीबाप्पा मोरया, मंगलमू र्ती मोरया’ या घोषणेसह ढोलताशांच्या गजरात मूर्तींची हर्षोल्हासात  प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. रात्री उशिरापर्यंंत जिल्हय़ातील शहरी  भागात २४५ तर ग्रामीण भागात ४४१ अशा एकंदरीत ६८६  सार्वजनिक गणेश मंडळांकडून ‘श्रीं’ची स्थापना करण्यात आली.  यामध्ये २१0 गावांत एक गाव-एक गणपती या उपक्रमाचादेखील  समावेश आहे.वाशिम येथे रिमझिम पाऊस, भक्तांचा ओसंडून वाहणारा उत्साह,  ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण, जागोजागी वाहतुकीची  कोंडी आणि रस्त्यांवरचे लहान-मोठे खड्डे चुकवत बाप्पा घरोघरी  पोहोचले. सार्वजनिक गणेश मंडळांसह घरोघरी मोठय़ा संख्येने  श्रींची स्थापना करण्यात आली. सकाळच्या सत्रात घरगुती  गणेशमूर्तीच्या खरेदीसाठी वाशिम शहरातील नगर परिषद चौक  मार्ग, पाटणी चौक आदी ठिकाणी भाविकांची झुंबड उडाली होती.  पूजेचे साहित्य आणि गणेशमूर्तीसह मोरयाचा गजर दिसून आला.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते नगर परिषद चौक या दरम्यान  स्थानिक विठ्ठलवाडी मंगल कार्यालयाजवळचा रस्ता पोलिसांनी  दुचाकी वाहनांसाठी बंद ठेवला होता. सायंकाळपर्यंंत हा परिसर  भाविकांच्या गर्दीने  फुलला होता. गणरायांसमोर आरास  करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य स्थानिक पाटणी  चौकस्थित बाजारात उपलब्ध होते. दुपारनंतर सार्वजनिक गणेश  मंडळांच्या कार्यकर्त्यांंनी मिरवणुकीद्वारे मूर्तींंची प्रतिष्ठापना केली.  गणेशोत्सवादरम्यान शांतता राखावी यासाठी पोलीस प्रशासनानेतर्फे  चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रिसोड शहरासह तालुक्यात सर्वत्र बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यासाठी  भक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते. सकाळपासूनच श्रींच्या मू र्ती घेऊन जाण्यासाठी गाव, गल्लीतून वाजत-गाजत भक्त रिसोड  शहरात दाखल झाले होते. कारंजा, मालेगाव, मानोरा व मंगरूळ पीर येथे ढोल-ताशांचा निनाद व मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात  श्रींची भव्य मिरवणूक काढून स्थापना करण्यात आली. ग्रामीण  भागातही मोठय़ा उत्साहात भक्तांनी स्वागत केले. लाडक्या  गणरायांच्या स्वागतासाठी घरातील आबालवृद्ध आणि मंडळातील  कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून तयारीमध्ये गुंतले होते.  शुक्रवारपासून या आनंद सोहळ्याला सुरुवात झाली. आता पुढील  दहा दिवस जिल्हय़ाच्या कानाकोपर्‍यात ‘मोरयाङ्घमोरया’चा  जयघोष होणार आहे.