शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

रानभाज्या नामशेष होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: August 7, 2015 01:16 IST

तणनाशकाच्या वाढता वापर.

कारंजा लाड (जि. वाशिम): गतकाही वर्षांपासून शेतीपद्धतीत झालेला विघातक बदल आणि तणनाशकाच्या वाढत्या वापरामुळे गावरान वाण नष्ट झालेच शिवाय पावसाळ्याच्या दिवसांत शेताच्या बांधावर उगवणाऱ्या रानभाज्याही नामशेष झाल्याचे दिसत आहे. त्याशिवाय जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे.विविध नैसर्गिक संकटे, शासनाचे धोरण, वाढत्या महागाईच्या तुलनेत शेतमालाला मिळणारे अत्यल्प भाव, तसेच मजुरांची वाणवा आदि कारणांमुळे भारतीय शेतीपद्धती पूर्णपणे बदलली आहे. शेतीपद्धतीत झालेल्या बदलाचे दुष्परिणाम आता मोठ्या प्रमाणात दिसत आहे. पावसाळ्यात सर्वत्र शेताच्या बांधावर व शेतामध्ये अनेक रानभाज्या निसर्गत: उगवतात. पूर्वीच्या काळी या भाज्या मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत; परंतु गत काही वर्षांमध्ये तणनाशकाच्या वापरात वाढ झाल्याने या रानभाज्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. रानभाज्या म्हणजे गरीब शेतमजूर, शेतकऱ्यांचा रानमेवा; परंतु हा रानमेवा आता तणनाशकाच्या अति वापरामुळे नामशेष होत असून पावसाळ्यांत या जेवणाची लज्जत वाढविणाऱ्या या भाज्याच नाहीशा होत आहेत. पूर्वी पावसाच्या आगमनाने शेतीला मातीच्या सुंगधाने मन प्रसन्न व्हायचेच. त्याचबरोबर शेताच्या बांधांवर चवळी, तरोटा, अंबाडी, चाकवत, चिवडी, लालमाठ, कटुले, अशा अनेक रानभाज्या आपोआप उगवायच्या. त्यामुळे आतासारखी महागाई तेवढी जानवत नव्हती. शेतकरी. शेतमजुरांचा अर्धा हिवाळा या भाज्यांवर निभायचा. शेतमजुर महिला घरी परत येत असताना या भाज्या तोडून आणायच्या, त्यामुळे दोन वेळेच्य भाजीची सोय व्हायची. जुन्याजाणत्या अनेकांना आजही या भाज्या आठवतात. अजच्या घडीला यातील काही भाज्या आगाऊ पैसे देवून विकत घेतल्या जातात. दशकभरापूर्वी शेती करायच्या पध्दतीत भरपूर बदल झाले आहे. शेतीच्य गरजा वाढल्या आहे. पिकासोबत येणारे तण काढून टाकण्यासाठी निंदणाची गरज असते आणि त्यासाठी मजुरांची अत्यंत निकड असते. आजच्या घडीला मजुर मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे वैज्ञानिकांनी तणनाशकाचा शोध लावला. मजुरी वाढल्याने शेतकरी ना इलाजाने अशा औषधाचा वारंवार वापर करीत आहेत. त्यामुळे शेतात बांधावर उगवणाऱ्या चवळीची भाजी करडु, कोसळी, अंबाडी, तरोटा, वाघाटे, आणि रानभाज्या नामशेष होताहेत. कृषी क्षेत्रात होत असलेल्या नवनवीन संशोधनामुळे अनेक जुने गावराण वाणही नष्ट होत आहे. शेतात उगवणाऱ्या व रस्त्यावर उगवणाऱ्या तरोट्याची जागा आता गाजर गवताने घेतली आहे. तणनाशकाच्या वापराचे दुष्परिणाम समोर येत आहेत.