मालेगाव : शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने प्रभाग क्र. ८ मध्ये रस्त्यावरून हजारो लिटर पाणी वाहून जात आहे. ही जलवाहिनी तीन दिवसांपासून फुटली असतानाही याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांत रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मालेगाव शहराला कुरळा धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपंचायतने ही तात्पुरती थातूरमातूर जलवाहिनी टाकली आहे. यासाठी येथील पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याची टाकीही बांधण्यात आली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे असतानाही तीन दिवसांपूर्वी ही जलवाहिनी फुटली असून, अद्यापही ही जलवािहनी दुरुस्त करण्याची तसदी घेण्यात आली नाही. हजारो लिटर पाण्याचा यामुळे अपव्यय होत असतानाही ही जलवाहिनी दुरुस्त करण्याचा साधा प्रयत्नही प्रशासनाकडून करण्यात आला नाही. यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना अडचणी येत असून, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागरिकांत रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. मालेगाव नगरपंचायतीने ही जलवाहिनी तातडीने दुरुस्त करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
००००००००००००००००००००००
वारंवार घडणाऱ्या घटनेकडे दुर्लक्ष का
मालेगाव शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेली जलवाहिनी तकलादू असल्याने ती वारंवार फुटून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. मालेगाववासीयांना यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामनाही करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जलवाहिनी बदलण्याची गरज आहे, प्रत्यक्षात वारंवार जलवाहिनी फुटत असतानाही त्याकडे दुर्लक्ष का होते, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
260821\img-20210826-wa0056.jpg
पाणी