शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

पाणी बचतीसाठी ठिबक, तुषार सिंचन पद्धत काळाची गरज  - प्रशांत बोरसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 15:47 IST

सिंचनासाठी ठीबक, तुषार संचाचा वापर व्हायला हवा, पाणीवापर संस्थांचे बळकटीकरण होणे आवश्यक आहे. तरच पाणी बचत शक्य होईल.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गतवर्षीच्या पावसाळ्यात तुलनेने चांगले पर्जन्यमान झाले. यामुळे मध्यम व लघू अशी सर्वच धरणे काठोकाठ पाण्याने भरली होती. असे असताना दरवर्षीप्रमाणे यंदाही मे महिन्याच्या सुरूवातीलाच सर्वच धरणांची पाणीपातळी कमालीची खालावली आहे. अन्य जलस्त्रोतही कोरडे पडल्याने पुन्हा एकवेळ भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यास कारणीभूत असलेल्या बाबी आणि त्यावर नियंत्रण मिळविणे शक्य की अशक्य, आदिंबाबत जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांच्याशी साधलेला संवाद... 

वाशिम जिल्ह्यात एकूण सिंचन प्रकल्प किती आणि सद्य:स्थिती काय? वाशिम जिल्ह्यात १३१ लघू आणि ३ मध्यम अशी एकंदरित १३४ सिंचन प्रकल्प आहेत. त्यातील काही धरणांमधून पिण्याचे पाणी देखील आरक्षित केले जाते. गतवर्षी सर्वच प्रकल्प पाण्याने तुंडूब भरली होती; मात्र चुकीच्या पद्धतीने होणारा पाण्याचा अवाजवी वापर, यंदा तीव्र उन्हामुळे बाष्पीभवनाचे वाढलेले प्रमाण यासह तत्सम कारणांमुळे ९ मे २०१९ अखेर धरणांमध्ये केवळ ७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे.

पाणी बचतीसाठी काय करता येणे शक्य आहे?  भौतीकदृष्ट्या जिल्ह्यात आता सिंचन प्रकल्प उभारणे अशक्य आहे. त्यामुळे आपल्या गावात झालेले धरण हे आपल्याच मालकीचे आहे, अशी खूनगाठ मनाशी बांधून प्रत्येकाने त्यातील पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. सिंचनासाठी ठीबक, तुषार संचाचा वापर व्हायला हवा, पाणीवापर संस्थांचे बळकटीकरण होणे आवश्यक आहे. तरच पाणी बचत शक्य होईल.

सिंचन शाखांची सद्य:स्थिती काय? जिल्ह्यात १६ सिंचन शाखा कार्यान्वित आहेत; परंतु त्यात उपलब्ध मनुष्यबळ तुलनेने फारच कमी आहे. ही बाब लक्षात घेवून पाणीवापर संस्थांचे बळकटीकरण करण्यावर विशेष भर दिला जात आहे. 

जुन्या प्रकल्प परिसरातील कालवे दुरूस्तीबाबत काय सांगाल? धरणांमधील पाणी उपसा पद्धतीने घेण्यावर शेतकºयांचा अधिक कल असतो. यामुळे खालच्या गावांमधील शेतकºयांना कालव्याव्दारे पाणी मिळत नाही. भविष्यात मोठा संघर्ष निर्माण करणारी ही स्थिती बदलण्यासाठी गावागावात पाणीवापर संस्था पूर्ण ताकदीने सक्षम होणे आवश्यक आहे. नादुरूस्त कालव्यांच्या दुरूस्तीकरिता अंदाजपत्रके तयार करून शासनाची मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव सादर केले जात आहेत.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई