वाशिम: आग विझविण्याची जबाबदारी खांद्यावर असणारे अग्निशमन दल आजमितीला कर्तव्यापासून पार भरकटले दिसुन येत आहे.अधिकारी व पदाधिकार्यांच्या इशार्यावर या विभागाच्या गाड्या आग विझविण्याचे सोडुन शहरातील काही धुरिणांच्या घरी पाणी चक्क भरीत आहेत. शहर पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या प्रकाराने ही बाब अधोरेखित केली आहे. वाशिम शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहत असलेल्या बंगल्यावर गत दोन दिवसांपासून या विभागाची गाडी पाणी भरत असुन नगरपरिषदेच्या मनमानी कारभाराबद्दल तहाणेने व्याकुळ झालेल्या नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मागील वर्षी शहरातील एका बिअर बार मध्ये नगर परिषदेचे टँकर पाणी भरत असल्याचा प्रकार ह्यलोकमतनेह्ण उघड केला होता. या प्रकारामुळे नगर परिषद प्रशासन जागे झाले असेल असे वाटत होते. मात्र, प्रशासनाने ह्यरात गयी, बात गयीह्ण हा कित्ता गिरवून पोलिस अधिकार्याच्या घरी चक्क अग्निशामनच्या वाहनाद्वारे गेल्या दोन-तीन दिवसापासुन पाणी भरण्याचे काम सुरू केले आहे. वास्तविक पाहता अग्निशमन दलाच्या वाहनाचा उपयोग आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिताच करता येतो. त्याकरिता अग्नीशमन वाहन, त्यामध्ये पाणी साठा व त्यावरील कर्मचारी नेहमी सज्ज ठेवणे पालिका प्रशासनाला अत्यावश्यक असते, तसे शासनाचे निर्देश सुध्दा आहेत. असे असतांनाही अग्निशमन दलाच्या गाडीतील पाणी साठा नगरपरिषद पदाधिकारी एखाद्या अधिकार्याला खुश ठेवण्यासाठी वापरत असतील तर यापेक्षा शहरवासीयांचे दुर्दैव काय असु शकते असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे. शासन निदेर्शानूसार अग्नीशमन दलाचा वापर कुणाच्या बंगल्यावर पाणी भरण्याकरीता करता येत नाही. मात्र शासन निर्देश पायदळी तुडविण्याचा प्रकार सद्या वाशिम नगर परिषदेमध्ये दिसुन येत आहे.
अग्निशमाक दलाची गाडी भरते ठाणेदाराच्या घरी ‘पाणी’
By admin | Updated: May 14, 2014 00:29 IST