शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

जलजागृती सप्ताह उरला नावापुरता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:41 IST

वाशिम : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दिनांक १६ ते २२ मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह राबविण्यात येतो; मात्र वाशिम जिल्ह्यात ...

वाशिम : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दिनांक १६ ते २२ मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह राबविण्यात येतो; मात्र वाशिम जिल्ह्यात गतवर्षीपासून हा सप्ताह केवळ नावापुरताच साजरा होत असून, जनजागृतीपर कुठलेही उपक्रम राबविले जात नसल्याचे दिसत आहे. शासन स्तरावरून प्रचारकार्यासाठी निधीच मिळत नसल्याने विशेष असे कुठलेही उपक्रम राबविले जात नसल्याचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी सांगितले. दरवर्षी उद्भवणारा पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी जनतेचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. पाण्याची उपलब्धता, पाणी वापराचे नियोजन, पाण्याचा अपव्यय टाळणे, गरजेपुरता वापर करणे, नैसर्गिक जलस्रोत, नद्या आणि जलाशयांचे प्रदूषण रोखणे, पायाभूत सुविधांचे संरक्षण करणे, पाण्यासंबंधीचे कायदे आणि नियमांचे पालन करण्याबाबत समाजात जागृती व जलसाक्षरता निर्माण होण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने २२ मार्च रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या जागतिक जलदिनानिमित्त दिनांक १६ ते २२ मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह राबविण्यात यावा, असे आदेश राज्य शासनाने ९ मार्च २०१६ रोजी पारित केलेल्या शासन निर्णयाव्दारे दिले होते. या सप्ताहादरम्यान जिल्हा, तालुका व गाव पातळीवर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमार्फत जलजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करावे, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र शासन निर्णय पारित झाला, तेव्हापासून केवळ एक वर्ष तत्कालिन कार्यकारी अभियंता जयंत शिंदे यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात जलजागृती सप्ताह धुमधडाक्यात साजरा करण्यात आला होता. तेव्हापासून मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शासनाने बाळगलेल्या मूळ उद्देशालाच तडा जात असल्याचे दिसून येत आहे.

.......................

कोट : गतवर्षी मार्च महिन्यातच कोरोना विषाणू संसर्गाची सुरूवात झाली होती. त्यामुळे जलजागृती सप्ताहांतर्गत कुठलेही उपक्रम राबविण्यात आले नाहीत. यावर्षीही तशीच परिस्थिती असून, गर्दी होईल असे कुठलेही कार्यक्रम घेण्यास शासनाने परवानगी नाकारली आहे. शिवाय निधीची तरतूद नसल्याने प्रचारकार्य अशक्य ठरत आहे.

- प्रशांत बोरसे

कार्यकारी अभियंता, जलसंपदा, वाशिम