शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्ज वितरणावर ‘वॉच’

By admin | Updated: June 24, 2016 00:02 IST

जिल्हा उपनिबंधक व अग्रणी बँकेचा पुढाकाराने शेतक-यांपर्यंंत पीक कर्ज पोहचते करण्यासाठी ‘अँक्शन प्लॅन’.

वाशिम:२0१६-१७ या वर्षात पीक कर्ज घेताना शेतकर्‍यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून वाशिम जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने ह्यअँक्शन प्लॅनह्ण तयार केला आहे. खरीप पीक कर्जाचा लाभ घेताना किंवा कर्ज पुनर्गठन करताना कोणतीही अडचण आल्यास शेतकर्‍यांना तालुका उपनिबंधक कार्यालय व प्रमुखांच्या मोबाइल क्रमांकावर तक्रार नोंदविता येणार आहे. शासनामार्फत केल्या जात असलेल्या सोप्या पीक कर्ज वितरणाच्या प्रयत्नांना काही बँकांचे प्रशासन फारसा प्रतिसाद देत नसल्याची वस्तुस्थिती आहे. या पृष्ठभूमीवर वाशिम जिल्ह्यात पीक कर्ज घेताना शेतकर्‍यांना येणार्‍या अडी-अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालय आणि जिल्हा अग्रणी बँकेने ह्यअँक्शन प्लॅनह्ण तयार केला आहे. २0१६-१७ च्या खरीप हंगामाकरिता जिल्ह्यातील कोणताही पात्र शेतकरी पीक कजार्पासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्यात येत असून, जून अखेरपर्यंंत पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या जिल्ह्यात ७८ टक्के पीक कर्जाचे वितरण झाले आहे.पीक कर्ज, पुनर्गठन किंवा रूपांतरणाविषयी कोणतीही अडचण असल्यास जिल्हा उपनिबंधक कार्यालयात जी.बी. राठोड व एम.जे. भेंडेकर, वाशिम सहायक निबंधक कार्यालयात बी.ए. कोल्हे, रिसोड सहायक निबंधक कार्यालयात आर.आर. सावंत, मालेगाव सहायक निबंधक कार्यालयात पी.टी. सरकटे, मंगरुळपीर सहायक निबंधक कार्यालयात पी.एन. गुल्हाने, कारंजा कार्यालयात डी.डी. दारमोडे, मानोरा सहायक निबंधक कार्यालयात आर.बी. राठोड यांचे मोबाइल क्रमांक शेतकर्‍यांसाठी ह्यपीक कर्ज : तक्रार निवारण केंद्रह्ण म्हणून घोषित केले आहेत. शेतकर्‍यांनी तक्रार नोंदविल्यानंतर तातडीने निराकरण केले जाणार आहे. खासगी बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक व राष्ट्रीयीकृत बँकांशी संबंधित पीक कर्ज व पुनर्गठनाबाबत शेतकर्‍यांना जिल्हा अग्रणी बँक किंवा संपर्क अधिकारी इंगोले यांच्याशी संपर्क करावा, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्‍वर खाडे यांनी दिली.