शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये कडकडीत बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:15 IST

वाशिम: श्रावण मासानिमित्त शिवलिंगाच्या जलाभिषेकसाठी  कावडव्दारे जल आणण्याकरिता परळी वैजनाथ येथे गेलेल्या  कावडधारी युवकास परळी ते परभणी मार्गावरुन उचलून पोलिसांनी  अटक केल्याच्या निषेधार्थ शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी  बुधवारी पुकारलेल्या वाशिम बंदला १00 टक्के प्रतिसाद मिळाला.  यामुळे दिवसभर शहरातील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता.

ठळक मुद्देशिवभक्तांवरील कारवाईचा निषेध हिंदुत्ववादी संघटनांनी व्यक्त केला रोष

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: श्रावण मासानिमित्त शिवलिंगाच्या जलाभिषेकसाठी  कावडव्दारे जल आणण्याकरिता परळी वैजनाथ येथे गेलेल्या  कावडधारी युवकास परळी ते परभणी मार्गावरुन उचलून पोलिसांनी  अटक केल्याच्या निषेधार्थ शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी  बुधवारी पुकारलेल्या वाशिम बंदला १00 टक्के प्रतिसाद मिळाला.  यामुळे दिवसभर शहरातील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता.बुधवार, २ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास शहरातील शुक्रवारपेठ  भागातील विठ्ठल मंदिर परिसरात दोन गटात दगडफेकीची घटना  घडली होती. या घटनेत एम.एच.३७ व्ही १0१0 या क्रमांकाच्या  चारचाकी वाहनासह सात ते आठ मोटारसायकलचीदेखील तोडफोड  करण्यात आली. परिसरातील पथदिवे तसेच अनेक घरांसमोरील  विद्युत मीटरचीसुध्दा या घटनेत नासधूस करण्यात आली. मोठय़ा प्रमाणात झालेल्या दगडफेकीमुळे तीन जण गंभीर स्वरूपात  जखमी झाले होते. याप्रकरणी प्रवीण सुरेश खुळे यांच्या फिर्यादीवरून  दोन्ही गटातील २५ ते ३0 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात  आला होता. दरम्यान, काही युवक श्रावण मासानिमित्त परळी वैजना थ येथे कावड घेऊन गेले होते. परतीच्या प्रवासात वाशिमकडे पायी  येत असताना त्यातील एका युवकास वशिम पोलिसांनी मारहाण  करून परभणी येथून वाशिमला आणले व अटक केली. यामुळे मात्र  हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या. सदर घटनेच्या निषेधार्थ  वाशिम शहरात बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. वाशिम पोलिसांच्या निषेधार्थ पहिल्यांदाच शहरात कडकडीत बंद  पाळण्यात आला असून, शहरातील बाजारपेठेत यामुळे दिवसभर  शुकशुकाट पसरला होता. शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने, लहान-मोठे  व्यापारी, भाजीपाला मार्केट, फळ विक्रेते आदिंनी स्वयंस्फूर्तीने आपा पली दुकाने बंद ठेवून शिवभक्तावरील कारवाईचा निषेध नोंदविला.  यादरम्यान, ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता. त्यामुळे  कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

अत्यावश्यक सुविधांना बंदमधून वगळले!आजच्या ‘वाशिम बंद’मधून शहरातील रुग्णालये, मेडिकल्स, बँका,  शासकीय-निमशासकीय  कार्यालये, राज्य परिवहन तसेच शाळा व  महाविद्यालय या अत्यावश्यक सुविधांना वगळण्यात आले होते.  त्यामुळे कुणाचीही विशेष गैरसोय झाली नाही.