शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जि.प. अध्यक्ष पदासाठी २९ जून रोजी निवडणूक

By admin | Updated: June 22, 2016 00:39 IST

निवड सभेबाबत सदस्यांना पत्र; जनहित याचिकेवर आज सुनावणी.

वाशिम : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा अडीच वषार्ंचा कार्यकाळ ३0 जून रोजी संपणार आहे. दरम्यान, अध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीवर एका सदस्याने आक्षेप घेतल्याने निवडणूक कधी होणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. आता निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी २९ जून रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसंदर्भात सभा असल्याबाबतचे पत्र सदस्यांना रवाना केल्याने तूर्तास संभ्रम दूर झाला आहे. दुसरीकडे आरक्षण सोडतप्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेवर २२ जून रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती याचिकाकर्ते विकास गवळी यांनी दिली.वाशिम जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर २0१३ मध्ये झाली होती. या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १७, राष्ट्रवादी काँग्रेस आठ, शिवसेना आठ, भाजपा व अपक्ष प्रत्येकी सहा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना चार व भारिप-बमसं तीन असे पक्षीय बलाबल राहिले. अध्यक्ष व सभापतींच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस युतीने अपक्षांच्या मदतीने सत्ता मिळविली. अध्यक्ष, उपाध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ ३0 जून रोजी संपत असल्याने आता २९ जून रोजी निवडणूक होणार आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी सर्व जिल्हा परिषद सदस्यांना पत्र रवाना करून २९ जून रोजी जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी निवड सभा होणार असून, याला उपस्थित राहण्याचे कळविले आहे. दुसरीकडे जनहित याचिकेवरील निर्णय प्रलंबित आहे.