शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

वाशिमवासी स्वच्छतेसाठी रस्त्यावर

By admin | Updated: January 12, 2015 01:48 IST

मारवाडी युवा मंचचा उपक्रमात विविध संघटनांचा पुढाकार.

वाशिम : वाशिम शहरामध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या विविध संघटनांच्यावतीने ११ जानेवारी रोजी शहरात संध्याकाळी ६ वाजतापासून रात्री उशिरापर्यंत स्वच्छता अभियान राबविले. या अभियानात शहरवासीयांनी स्वच्छेने उतरून शहराची स्वच्छता केली. मारवाडी युवा मंचच्या उपक्रमास विविध संघटनांनी दिलेल्या पुढाकाराने हा उपक्रम अविरत सुरू ठेवण्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. यावेळी ४00 च्यावर नागरिक सहभागी झाले होते. गत आठ दिवसांपासून मारवाडी युवा मंच विविध उपक्रम राबवून ११ जानेवारी रोजी आयोजित स्वच्छता अभियान कार्यक्रमाची माहिती शहरातील गणमान्य जनतेसह विविध संघटनांना देऊन पुढाकार घेण्याचे आवाहन करीत होती. आज ११ जानेवारी रोजी संध्याकाळी कार्यक्रमास सुरुवात झाल्याबरोबर मोठय़ा प्रमाणात शहरात गर्दी निर्माण होऊन सर्वत्र धूळ उडताना दिसून आली. स्वच्छता अभियानात सहभागी सर्वांंना पांढर्‍या रंगाच्या कॅप व तोंडाला रूमाल हातात खराटा देऊन सर्वांंनी स्वच्छता केली. कचरा उचलण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारीही यात सहभागी झाले होते. शहरात वापरण्यात येत असलेल्या कचरा गाड्याद्वारे कचरा गावाबाहेर नेऊन टाकण्यात आला. शहरातील रस्त्यावर एकाच वेळी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात स्वच्छता अभियान राबविण्यात आले असून, वाहतुकीस कोणत्याच प्रकारचा अडथळा येऊ नये याकरिता शहर वाहतूक शाखेच्यावतीने बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच वाशिम शहर पोलीस स्टेशनच्यावतीने ही बंदोबस्त लावण्यात आला होता. सदर उपक्रम आठवडयातून एक दिवस या प्रमाणात राबविण्यात यावा, अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली.