वाशिम : ह्यस्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारचह्ण, अशी गर्जना करून इंग्रज राज्यकर्त्यांची झोप उडविणार्या लोकमान्य टिळकांच्या जयंतीदिनी स्थानिक पालिका प्रशासन मात्र कुंभकर्णाप्रमाणे झोपलेले दिसून आले. पालिकेच्या मालकीच्या असलेल्या टिळक उद्यानात टिळकांचा विलोभनीय पुतळा आहे; परंतु या पुतळ्याला हारार्पण करून लोकमान्यांना अभिवादन करण्याचे सौजन्य न दाखवून पालिकेच्या पदाधिकारी व अधिकार्यांनी त्यांना झालेला लोकमान्याच्या जयंतीचा विसर अधोरेखित केला आहे.शहरात असलेल्या टिळक उद्यानात लोकमान्यांचा पुतळा आहे; परंतु पालिकेच्या दुर्लक्षामुळे आजमितीला सदर पुतळ्याला गवताने वेढलेले आहे. लोकमान्यांची जयंती असली तरी पालिकेने सदर पुतळ्याजवळील गवत साफ करण्याची तसदी घेतली नाही. एवढेच नव्हेतर पािलकेच्या एकाही अधिकारी व पदाधिकार्याने लोकमान्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन त्यांना अभिवादन करण्याचे सौजन्य दाखविले नाही. वास्तविक सदर उद्यान पालिकेच्या मालकीचे आहे. त्यामुळे येथे असलेल्या लोकमान्यांच्या पुतळ्यालगतच्या गवताची सफाई करणे अथवा त्यांना अभिवादन करणे ही पालिकेची जबाबदारी आहे; परंतु यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही.
वाशिम पालिकेला ‘लोकमान्यांचा’ विसर
By admin | Updated: July 24, 2014 02:08 IST