वाशिम : यंदा जिल्ह्यात झालेल्या अत्यंल्प पावसामुळे शेतकर्यांना दुबार व तिबार पेरण्या कराव्या लागल्या आहेत. आजमितीलाही पावसाअभावी पिक परिस्थिती चिंताजनक असुन शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने एकमुखाने घैतला आहे. जिल्हा परिषदेच्या दिवंगत वसंतराव नाईक सभागृहात ११ ऑगस्टला स्थायी समितीची सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षा सोनाली जोगदंड होत्या. तर उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमेंद्र ठाकरे, शिक्षण व आरोग्य सभापती चक्रधर गोटे, समाजकल्याण सभापती पानुबाई जाधव, महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई गणेशपुरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक वानखेडै आदींची उपस्थिती होती. .यावेळी सभेत अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. सभेला जि. प. सदस्य विकास गवळी, सचिन रोकडे, वित्त वलेखा अधिकारी हिवाळे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंताएस. के. शेगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी मेहकरकर, उप अभियंता निलेशराठोड, शाखा अभियंता कुणाल तायडे, लघुलेखक नागेश थोरात, उमेश बोरकर,जिल्हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी राम श्रृंगारे, सहाय्यक विलासमोरे,सहाय्यक लेखाधिकारी प्रकाश टीकेयांच्यासह इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सामान्यप्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे यांनी सभेचे संचालन केले.
** स्थायी समितीच्या सभेत असे झाले निर्णय
- रस्ते, जुन्यावाहनांची हराश्री करणे, नविन वाहन खरेदी करणे, केनवड येथील पाणी पुरवठायोजना, आरोग्य केंद्र ईत्यादी अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
- पशुसंवर्धन विभागाची कामधेनु योजना आणि शाळेवर रुजु न होणार्या शिक्षकांचा मुद्दा सभेत चचीर्ला गेला. यावर योग्य कार्यवाहीकरण्याचे आश्वासन अधिकाज्यांनी यावेळी दिले. - आपल्या कामात हलगर्जीपणा करणार्या कर्मचाज्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी आग्रही मागणी उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी सभागृहात रेटून धरली
- लगर्जीपणा कर्मचार्यांन ाकारणे दाखवा नोटीस देण्यात येइल असे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारीअधिकारी संजय इ्ंगळे यांनी सांगीतले.निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी जास्तीत जास्त विकास कामे करुन अखर्चीतनिधी खर्च करण्याच्या सुचना उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी विभागप्रमुखांना दिल्या.