शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा परिषद ‘सेस’चा ८३ लाखांचा निधी अखर्चित

By admin | Updated: June 16, 2016 02:16 IST

लघुसिंचन विभागातील प्रकार; ४३ कामांसाठी होती १.२0 कोटी निधीची तरतूद!

संतोष वानखडे / वाशिमनाला खोलीकरण, कोल्हापुरी बंधारे दुरुस्ती यासह लघू सिंचनाच्या कामांसाठी ह्यसेसह्णमधून मिळालेल्या १.२0 कोटींपैकी मार्च २0१६ अखेर जिल्हा परिषदेच्या लघू सिंचन विभागाला केवळ ३७ लाख ३९ हजार रुपये खर्च करता आले. उर्वरित ८२ लाख ६१ हजारांचा निधी अखर्चित राहिला आहे.मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागात विविध प्रकारची विकासात्मक कामे केली जातात. विविध कामांची विभागणी करून नियोजनाची जबाबदारीही त्या-त्या विभागावर सोपविण्यात येते. ग्रामीण भागात लघू सिंचनाच्या सुविधा निर्माण करणे, कोल्हापुरी बंधार्‍याची दुरुस्ती, नव्याने कोल्हापुरी बंधार्‍याची निर्मिती, नाला खोलीकरण व नाला सरळीकरण, डोह खोदणे आदी कामांची जबाबदारी लघू सिंचन विभागावर सोपविण्यात आली आहे. या कामांमधून सिंचनाची सुविधा निर्माण करणे, जलपातळीत वाढ करणे अपेक्षित आहे. कामांचा अनुशेष भरून काढणे, नादुरूस्त बंधार्‍यांची दुरूस्ती करणे, नवीन कामे प्रस्तावित करणे आदी कामांचे नियोजन करून जिल्हा परिषदेच्या उत्पन्नातून ह्यसेसह्ण फंडांतर्गत या कामांसाठी निधीची तरतूद केली जाते. सन २0१५-१६ या वर्षात लघू सिंचन विभागाने एकूण ४३ कामे प्रस्तावित केली होती. या कामांसाठी एकूण १ कोटी २0 लाख रुपयांचा निधीही मंजूर होता. ४३ कामांची प्रत्यक्षात पाहणी व मोजमाप केल्यानंतर एकूण ३७ लाख ३९ हजार रुपयांचा निधी खर्च झाल्याची बाब निदर्शनात आली. त्यानुसार ३१ मार्च २0१६ अखेर या कामांवर ३७.३९ लाख रुपये खर्च झाला असून, उर्वरित ८२.६१ लाखांचा निधी अखर्चित राहिला. ह्यसेसह्णचा हा निधी जिल्हा परिषदेचा असल्याने सदर निधी शासनाकडे जमा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मात्र, हा निधी २0१६-१७ या वर्षात लघू सिंचन विभागालाच मिळेल, याची कोणतीही खात्री देता येत नाही. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचा अखर्चित निधी एकत्रित करून २0१६-१७ या वर्षासाठी या निधीचे नियोजन विभागनिहाय केले जाणार आहे.