शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

कठीण परिश्रमातून वाईंडरचा मुलगा झाला तुरूंगाधिकारी!

By admin | Updated: August 23, 2016 23:40 IST

रिसोड तालुक्यातील युवकांने निराश विद्यार्थ्यांंसमोर ठेवला आदर्श.

शीतल धांडेरिसोड(जि. वाशिम), दि. २३: घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असताना मनात जीद्द आणि अपार कष्ट करण्याची तयारी ठेवल्याने एका वाईंडरच्या मुलाने चक्क तुरुगांधिकारी पदापर्यंंत मजल मारली. येथील भारत प्राथमिक मराठी शाळेत शिक्षण घेतलेल्या विठ्ठल रघुनाथ पवार या युवकाची ही यशोगाथा परिस्थितीपुढे खचलेल्या विद्यार्थ्यांंसाठी प्रेरणादायी ठरली आहे. विठ्ठल यांनी दिवस-रात्र कठीण परिश्रमातून अभ्यास करित मोठय़ा पदाला गवसणी घालण्याचे स्वप्न बाळगले. ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी वाट्टेल ते करण्याची जीद्द अंगी बाळगल्यामुळेच आपणास हे यश संपादन करणे शक्य झाले, असे विठ्ठल पवार यांनी सांगितले. शिक्षण घेत असतानाच सन २0१४ मध्ये वडिलांचे अचानक निधन झाले. मात्र, वडिलांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचे ध्येय बाळगून अभ्यासाकडे पूर्ण लक्ष केंद्रीत केले. त्यामुळे आपणास स्पर्धा परिक्षेत यश संपादन करून तुरूंगाधिकारी होता आले, असेही विठ्ठल पवार म्हणाले.पवार यांचे प्राथमिक शिक्षण रिसोडच्या भारत प्राथमिक मराठी शाळेत झाले. १२ वीपर्यंंंंंत शिक्षण रिसोड येथे पूर्ण करून विज्ञान शाखेतून त्यांना ९१ टक्के गुण मिळाल्याने संगणक अभियंता या शाखेत जवाहरलाल दर्डा इन्स्टीटयुट ऑफ इंजीनिअरिंग अँन्ड टेक्नॉलॉजी, यवतमाळ या कॉलेजमध्ये गुणवत्तेच्या जोरावर प्रवेश मिळाला. संगणक अभियंता ही पदवी प्राप्त करुन पवार यांनी स्पर्धा परिक्षेची जोरदार तयारी सुरु केली. कौटूंबिक अडचणीचा सामना करीत सन २0१४ मध्ये तुरुगांधिकारी पदाची परिक्षा दिली. त्यातील लेखी परिक्षेत १00 पैकी ९१ टक्के गुणांनी उत्तीर्ण झालो. आपल्या कठीण काळात शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी जावाई बबन आव्हाळे व सासरकडील मंडळींनी मोठा आर्थिक हातभार दिल्यानेच हे यश संपादन करणे शक्य झाल्याचा उल्लेखही विठ्ठल पवार यांनी केला.