शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

चिखली जोडरस्त्याला मजबुतीकरणाची प्रतीक्षा

By admin | Updated: September 7, 2014 22:44 IST

मंगरुळपीर तालुक्यातील चिखली येथील रस्त्याची दुरवस्था.

मंगरुळपीर : शेलूबाजार आठवडी बाजारात जाण्यासाठी अत्यंत सोईच्या चिखली झोलेबाबा ते आठवडी बाजार रस्त्याकडे संबधीतांचे दुर्लक्ष असल्याने बाजारकरू नागरिक ,व्यापारी, शेकतर्‍यांना मोठय़ा प्रमाणात त्रास सहन करावे लागत आहे.ही समस्या दुर करण्यासाठी लोकप्रतिनिधीने पुढाकार घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.अकोला,शेलूबाजार येथुन मंगरूळपीरला जाण्यासाठी पुर्वी हाच रस्ता होता. परंतु काही काळानंतर या मार्गाला दूर लोटून अडाण नदीवर पुलाची निर्मिती करून बायपास काढण्यात आला. तेव्हा पासुन सदर रस्ता दुर्लक्षीत झाला. परंतु हा दुर्लक्षीत रस्ता बाजारकरू नागरिक, व्यापारी, शेतकरी तसेच सतीआई भक्तांसाठी अतिशय महत्वाचा आहे. तसेच मंगरूळपीर, मानोरा, वाशीम येथुन व्यापाराकरिता येणार्‍यांना हा रस्ता सोयीचा आहे.पावसाळय़ाचे दिवसात या मार्गावर ठिक ठिकाणी पाणी साचलेले असते. तसेच दोन ठिकाणी असलेल्या पुलाची अवस्था गंभीर आहे त्यामुळे पावसाळय़ात हा रस्ता वाहने येण्या जाण्या जोगा नसतो.पावसाळय़ाच्या दिवसात हा मार्ग वाहनाकरिता बंद असतो परिणामी शेलूबाजार चौकातील अतिक्रमणाच्या जाळय़ा तुन आठवडी बाजारात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. अनेक वेळा चौकात वाहतुकीचा खोळंबा निर्माण होतो. त्यामुळे व्यापार्‍यांना आपली वाहणे तर शेतकर्‍यांना जनावरे घेवुन जाताना अत्यंत त्रासाचे झाले आहे.याबाबत आजपर्यंंत कोणीच पुढाकार घेतल्याचे दिसुन येत नाही. या रस्त्याची दुरूस्ती झाल्यास आठवडी बाजाराच्या दिवशी शेलूबाजार चौकात वाहतुकीचा होणारा खेळखंडोबा दुर होवुन व्यापारी, शेतकर्‍यासाठी सोईचा होवु शकतो म्हणुन महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंर्तगत रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी शेलुबाजारसह परिसरातील जनतेतून होत आहे.