शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

८ वी ते १२ वीच्या शाळांसाठी ग्रामपंचायतींच्या प्रस्तावाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:46 IST

गेल्या दीड वर्षापासून कोरोना संसर्गामुळे ऑफलाईन शिक्षण बंद आहे. आता कोरोना संसर्गावर बऱ्यापेकी नियंत्रण मिळाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागांतील ...

गेल्या दीड वर्षापासून कोरोना संसर्गामुळे ऑफलाईन शिक्षण बंद आहे. आता कोरोना संसर्गावर बऱ्यापेकी नियंत्रण मिळाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागांतील कोरोनामुक्त गावांत शाळा सुरू करण्याची तयारी शिक्षण विभागाने केली आहे. यासाठी शासन निर्देशानुसार सरपंचांच्या अध्यक्षतेखालील तलाठी, शाळा समिती अध्यक्ष, केंद्रप्रमुख, वैद्यकीय अधिकारी, मुख्याध्यापक आणि ग्रामसेवकांचा समावेश असलेल्या ग्रामस्तर समितीची स्थापना करण्याचे निर्देशही जि. प. शिक्षण विभागाने दिले आणि शासनाच्या परिपत्रकानुसार १५ जुलैपर्यंत ग्रामपंचायतींनी ग्रामस्तर समितीच्या माध्यमातून पालकांशी चर्चा करून शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर सादर करण्याच्या सूचना दिल्या; परंतु चार दिवस उलटले असताना जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातून कारखेडा येथील एकाच ग्रामपंचायतीचा प्रस्ताव पंचायत समितीस्तरावर सादर झाला आहे. त्यामुळे कोरोनामुक्त गावातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होणार की नाही, अशी शंकाच उपस्थित होत आहे.

--------------

निर्जंतुकीकरणासह लसीकरणाला होणार विलंब

ग्रामीण भागांतील कोरोनामुक्त गावांत शाळा सुरू करण्यासाठी ग्रामस्तर समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतरही संबंधित शाळेचे निर्जंतुकीकरण करण्यासह लसीकरण न झालेल्या शिक्षकांचे आरोग्य विभागाच्या सहकार्याने लसीकरण करून घेण्याची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. शिवाय शाळा सुरू झाल्यानंतरही गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी सातत्याने उपाय योजना कराव्या लागणार आहेत; परंतु ग्रामपंचायतींची प्रस्ताव प्रक्रियाच पूर्ण झाली नसल्याने पुढील प्रक्रियेला विलंब लागणार आहे.

-----------------------

शिक्षकांच्या राहण्याची व्यवस्था कधी करणार

कोरोनामुक्त गावांत पुन्हा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या गावांत आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यापूर्वी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांना संबंधित शाळेतील शिक्षकांच्या राहण्याची व्यवस्था गावातच करावी लागणार असून, संबंधित शिक्षक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम ग्रामपंचायतीच्या प्रस्तावाची आवश्यकता आहे; परंतु ही प्रक्रियाच अपूर्ण असल्याने शिक्षकांची गावात राहण्याची व्यवस्था कधी करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

-----------------

कोट : शासनाच्या निर्देशानुसार कोरोनामुक्त गावांत आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखालील ग्रामस्तर समितीचा ठराव आणि ग्रामपंचायतींच्या प्रस्तावाची आवश्यकता आहे. ग्रामपंचायतीअंतर्गत ही प्रक्रिया सुरू असून, पंचायत समितीस्तरावर प्रस्ताव प्राप्त होताच पडताळणी करून शाळा सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

- रमेश तांगडे,

माध्यमिक शिक्षणाधिकारी, वाशिम