शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : शिरपुरात साकारतेय १५० फूट उंच मंदिरासह ‘पारसबाग’

By admin | Updated: September 20, 2016 15:03 IST

जैनाची काशी संबोधल्या जाणा-या श्री क्षेत्र शिरपूर जैन येथे ‘पारसबाग’ निर्माण कार्यास प्रारंभ झाला आहे.

- शंकर वाघ, ऑनलाइन लोकमत
शिरपूर जैन ( वाशिम), दि. २० -  जैनाची काशी संबोधल्या जाणा-या श्री क्षेत्र शिरपूर जैन येथे ‘पारसबाग’ निर्माण कार्यास प्रारंभ झाला आहे. विविध प्रदेशातील ६०० च्यावर कामगार या पारसबागेला आकार देण्याचे कार्य रात्रंदिवस करतांना दिसून येत आहेत. या बागेतील १५० चौरस फूट व उंचीलाही १५० फूट चतुरमूख मंदिराच्या कामास जैनमुनी विमलहंस विजयजी महाराज व परमहंसजी महाराज यांच्या प्रेरणेने प्रारंभ झाला आहे.
शिरपूर जैन येथे अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर संस्थानच्यावतीने होत असलेल्या विकास कामांमुळे पर्यटकांमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. शिरपुरात ‘पारसबाग’ स्थापन होत असल्याची माहिती अनेकांना मिळाल्याने पर्यटक भेट देत आहेत.  येथे स्थापन होत असलेल्या पारसबाग कामाकरीता ओरीसा, बिहारसह महाराष्टÑातील ६०० च्यावर कामगार काम करतांना दिसून येत आहेत. कामे करतांना कोणतीही अडचण निर्माण होवू नये म्हणून संस्थानच्यावतिने स्टोन कटर मशिन, क्रेन यासह लागणाºया विविध मशनरीज विकत घेतल्या आहेत.  येथे उभारण्यात येत असलेल्या या भव्य मंदिरामध्ये जैन तिर्थकारांच्या २४ मुर्त्या लावण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे मंदिराच्या गाभाºयात आर्ट गॅलरीची सुध्दा सुविधा निर्माण करण्यात आली असून त्यामध्ये थ्रीडी इफेक्ट राहणार आहे.  मंदिर परिसरातच बांधण्यात येत असलेल्या भव्य अशा विहिरीवर पार्श्वनाथ भगवानाचे जल मंदिर निर्माण करण्याच्या कामासही प्रारंभ करण्यात आला आहे. सदर काम लवकर पूर्ण करुन भाविकांना याचा लाभ मिळावा यासाठी संस्थान प्रयत्नशिल आहे.