रविवारी सकाळच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या हर्रासच्या वेळी पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. त्याचा चांगला परिणाम होऊन दिवसभर बाजारात ग्राहकांना स्वस्त दरात पालेभाज्या मिळाल्या, तर कांदा व आलूचे दर आज स्थिर होते. लसूणमध्ये प्रतिकिलोमागे १० ते २० रुपयांनी वाढ होऊन १३० रुपये प्रतिकिलोने विक्री झाली. यासह अद्रक ६० रुपये प्रतिकिलो, टमाटर ५, हिरवी मिरची ५०, दोडकी व भेंडी ४०, सिमला मिरची ५०, पत्ताकोबी १०, फुलकोबी २०, वांगी ४०, बरबटी व आवरा शेंग ४०, मेथी व पालक २०, बीट ४० रुपये प्रतिकिलो याप्रमाणे विक्री झाली.
................
खाद्यतेलाचे दर वाढले
खाद्यतेलाचे दर कमी होण्याचे नाव घेत नसल्याची स्थिती आहे. चालू आठवड्यातही दरामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
..............
फळांचे दर आटोक्यात
वाशिमच्या बाजारपेठेत परजिल्ह्यामधून फळांची आयात होते. हे दर चालू आठवड्यात आटोक्यात होते.
.............
कांदा, बटाटा स्थिर
गत आठवड्यात कांदे आणि बटाट्याचे दर प्रतिकिलो ४० ते ५० रुपयावर होते. तोच दर यंदा कायम होता. लसूणचे दर मात्र काहीअंशी वाढल्याचे दिसले.
...............
गेल्या काही दिवसापासून पालेभाज्याचे दर आटोक्यात आहेत. यामुळे दिलासा मिळाला आहे. खाद्यतेलाचे दर कमी व्हावे, अशी अपेक्षा आहे.
- अनिता कांबळे, गृहिणी
...........
पालेभाज्यांचे दर आता कमी झाले असून, ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली आहे. टमाटरला फारच कमी दर मिळत आहे. मेथी, पालक व कोथिंबिरचे दर घसरले आहेत.
- गोलू माळी, भाजी विक्रेता
..............
फळाच्या दरात चालू आठवड्यामध्ये फारशी वाढ झालेली नाही. यामुळे अधिक माल उपलब्ध करून देणे शक्य होत असून, ग्राहकांचे प्रमाण वाढलेले आहे. आमचाही अपेक्षित फायदा होत आहे.
- मो. अजीज, फळ विक्रेता