शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समित्यांच्या शिक्षण विभागातील ‘व्हीसी संच’ बंद

By admin | Updated: September 29, 2016 01:27 IST

व्हीसी संच धूळ खात पडून; वाशिम जिल्ह्यातील प्रकार.

वाशिम, दि. २८- जिल्हास्तरावरील शिक्षणाधिकार्‍यांना पंचायत समितीस्तरावरील अधिकारी, कर्मचार्‍यांशी विविध विषयावर सूचना करणे आणि आढावा घेण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या शिक्षण विभागात काही वर्षांपूर्वी व्हीसी संच बसविण्यात आले होते. सद्यस्थितीत सदर व्हीसी संच बंद असून धूळखात पडले आहेत. शिक्षण विभागातील विविध योजना, कार्यक्रम राबविण्यासाठी जिल्हास्तरावर विविध बैठकांचे आयोजन करावे लागते. त्यासाठी जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकार्‍यांसह इतरही कर्मचार्‍यांना जिल्ह्याची वारी करावी लागते. त्यासाठी संबंधित सर्वच अधिकारी, कर्मचार्‍यांचा मोठा वेळ खर्च हो तो आणि त्याचा इतर कामांवरही परिणाम होतो. ही बाब लक्षात घेऊन शिक्षण विभागाच्यावतीने पंचायत समिती स्तरावर शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी वेळोवेळी संपर्क व्हावा, त्यांना सूचना व मार्गदर्शन करणे सोपे व्हावे, तसेच बैठकांचा खर्च, वेळ आणि ताण कमी व्हावा म्हणून व्हिडीओ कॉन्फरन्सवर चर्चा करण्यासाठी व्हीसी संच बसविण्यात आले; परंतु यामधील काही व्हीसी संच बंद पडले आहेत. त्यामुळे अधिकारी, कर्मचार्‍यांना पुन्हा बैठकांचेच नियोजन करावे लागत आहे.पंचायत समिती स्तरावरील व्हीसी संचाची माहिती घेतली जाईल. सदर संच बंद का आहेत, याबाबत माहिती घेऊन योग्य त्या सूचना केल्या जातील.- डी.एच. जुमनाके, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. वाशिम