शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईनंतर छुप्या मार्गाने प्लास्टिक पिशव्यांचा वापर

By admin | Updated: June 16, 2017 01:40 IST

वाशिम येथील प्रकार : नगर परिषदेची मोहीम व्यर्थ

स्टिंग आॅपरेशनलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्यासाठी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक बॅग वापरण्यावर बंदी आहे. या संदर्भात वाशिम नगर परिषदेच्यावतीने कारवाई मोहीम हाती घेऊन अनेक व्यापाऱ्यांवर कारवाई केली होती. कारवाईचा धसका घेत काही दिवस शहरातून प्लास्टिक पिशव्या हद्दपार झाल्या होत्या; परंतु कारवाईनंतर अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने आता छुप्या मार्गाने प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे ‘लोकमत’ने १५ जून रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनवरून उघडकीस आले आहे.विविध प्रतिष्ठानांमध्ये व्यावसायिक प्लास्टिक बॅगचा सर्रास वापर करीत असल्याने नाल्यांमध्ये प्लास्टिक बॅग अडकण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. निसर्गाचा समतोल राखायचा असल्यास प्लास्टिक निर्मूलन आवश्यक आहे. यासाठी जनजागृती केली जात असली, तरी नागरिकांची मानसिकता बदलणे गरजेचे झाले आहे. यापूर्वी जिल्ह्यात कॅरीबॅग बंदीची मोहीम राबवून शहरात विविध व्यावसायिकांकडून दंड वसूल करण्यात आला. प्लास्टिक बॅगमुळे काय दुष्परिणाम होतात, यासंदर्भात पथनाट्य, कविता, गीतातून जनजागृती करण्यात आली. ही कारवाई थंड झाल्याबरोबर बिनधास्तपणे वापर होत नसला, तरी ग्राहकांनी प्लास्टिक पिशव्यांची मागणी केल्यावर तो परत जाऊ नये म्हणून त्याला पिशवी दिल्या जात आहे.१५ जून रोजी शहरातील काही दुकाने, भाजी मार्केट व फेरीवाल्यांच्या बाजूला उभे राहून येणाऱ्या ग्राहकांनी प्लास्टिक पिशवी लपून ठेवलेल्या ठिकाणाहून काढून देण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोग्यासाठी, पर्यावरणासाठी व जनावरांसाठी प्लास्टिक पिशव्या घातक असल्याने त्याचा वापर टाळावा, असे आवाहनही नगर परिषद आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. आरोग्यास घातक असलेल्या पिशव्यांचा वापर होत असल्याचे आज उघडकीस आले आहे. याबाबत नगर परिषदेने पुढाकार घेऊन पुन्हा कारवाई मोहीम हाती घेणे गरजेचे झाले आहे.