शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

बँक खात्याअभावी गणवेशाचा तिढा कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:40 IST

वाशिम: जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत  असलेल्या विद्यार्थ्यांना शासनाकडून शालेय गणवेश दिला जातो.  यंदा मात्र बदललेल्या शासकीय धोरणांमुळे शाळा सुरू होऊन दोन  महिने होत असताना गणवेशांचा तिढा अद्याप सुटलेला नाही.  

ठळक मुद्देअडीच कोटी रुपयांचा निधी पडून तोडगा कधी निघणार?

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत  असलेल्या विद्यार्थ्यांना शासनाकडून शालेय गणवेश दिला जातो.  यंदा मात्र बदललेल्या शासकीय धोरणांमुळे शाळा सुरू होऊन दोन  महिने होत असताना गणवेशांचा तिढा अद्याप सुटलेला नाही.  शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना गणवेश पुरविण्यासंबंधीच्या  तरतुदींमध्ये बदल करीत यावर्षीपासून थेट गणवेश न पुरविता  यासाठी लागणारी रक्कम विद्यार्थी व पालकांच्या संयुक्त खात्यात  जमा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, ग्रामीण भागातील  सर्वसामान्य कुटुंबातील काही पालकांनी बँकांमध्ये संयुक्त खाते  उघडले तर काही पालकांनी अद्यापही खाते उघडले नाही. एका  गणवेशासाठी २00 रुपये मिळणार आहे. प्रति विद्यार्थी दोन  गणवेशांसाठी एकूण ४00 रुपये बँक खात्यात जमा केले जाणार  आहेत. गणवेश खरेदी केल्याची पावती सादर केल्यानंतर ही रक्कम  संबंधित विद्यार्थ्यांच्या संयुक्त बँक खात्यात जमा केली जाणार  आहे. जिल्हय़ात जिल्हा परिषदेच्या ७७३ आणि नगर परिषदेच्या  ४५ अशा एकंदरीत ८१८ शाळांच्या मुख्याध्यापकांच्या खात्यात  २.५ कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे. विद्यार्थी व  पालकाच्या संयुक्त बँक खात्यांचे विवरण, आधार कार्डसह इतर  कागदपत्रांची पडताळणी करून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ही र क्कम जमा केली जाणार आहे. जिल्हय़ात जवळपास ८३ हजार  विद्यार्थी हे गणवेशासाठी पात्र आहेत. ४0 टक्के विद्यार्थ्यांचे बँक  खाते प्राप्त असून, अद्याप ६0 टक्के विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांक  मिळण्याची प्रतीक्षा आहे. जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या  ८१८ शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश पुरविण्याकरिता मुख्याध्या पकांच्या खात्यात २.५ कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आला  आहे. संबंधित पालकांनी यासंबंधीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर  त्यांच्या खात्यात ४00 रुपयांप्रमाणे रक्कम जमा केली जाईल, असे  शिक्षण विभागाने स्पष्ट केले.