शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गांजा व गुटख्याची दोन संशयास्पद वाहने ताब्यात

By admin | Updated: April 15, 2016 02:07 IST

कारंजा लाड येथील घटना.

कारंजा लाड ( जि. वाशिम):: गांजा व गुटख्याची वाहतूक करीत असल्याच्या संशयावरून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या ग्राम शेलुवाडा येथील ढाब्याजवळ दोन टाटा एसी वाहने १४ एप्रिल रोजी रात्नी ८ वाजताच्या सुमारास चौकशीसाठी ताब्यात घेतली. या वाहनांमध्ये गांजा व गुटख्याने भरलेली ३0 पोती पोलिसांना सापडल्याची चर्चा आहे. नागपूर- औरगांबाद महामार्गावर अवैधरीत्या गांजा व गुटखा घेऊन टाटा एसी वाहन येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावरून ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठोणदार श्रीराम घुगे यांच्या मार्गदशर्नात पोलिसांचे पथक तत्काळ रवाना झाले. शेलुवाडा नजिकच्या ढाब्याजवळ दोन वाहने संशयास्पद स्थितीत उभी असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यावरून पोलिसांच्या पथकातील पोलीस अधिकार्‍यांनी चौकशी केली असता. त्या वाहनामध्ये ३0 पोती आढळून आली. या पोत्यांमध्ये गांजा व गुटखा असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी टाटा एसी.क्र. एम.एच.२७ एक्स- ५६८२ व दुसरा टाटा एसी.क्र.एम.एच.२७ एक्स- ८२३९ ही दोन्ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेऊन वाहन चालक अनुक्रमे मो.साबीर मो. रफीक (१९), मो. साजिद मो. रफिक (२१) व शेख रहिम शेख मेहबूब (२९) सर्व राहणार अलिम नगर अमरावती यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.