लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर (वाशिम) : मंगरूळपीर तालुक्यातील पिंप्री बु. येथील दोन सख्ख्या बहिणींना अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची घटना १ जून रोजी घडली. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरूद्ध मंगरूळपीर पोलीस स्टेशनला २ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पिंप्री बु. येथील फिर्यादिने दिलेल्या तक्रारीत म्हटले की, फिर्यादीच्या २० वर्षीय मुलीस पाहण्याकरिता पाहुणे आले होते. १ जूनच्या सकाळी दहा वाजता कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादीच्या २० वर्षीय व १७ वर्षीय अशा दोन मुलींना फूस लावून पळवून नेले. १ व २ जून रोजी त्यांचा शोध घेतला असता, कुठेही आढळून आल्या नाहीत. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून मंगरूळपीर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवी कलम ३६३, ३६६ नुसार गुन्हा दाखल केला.
दोन सख्ख्या बहिणींना फूस लावून पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 16:45 IST
अज्ञात आरोपीविरूद्ध मंगरूळपीर पोलीस स्टेशनला २ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन सख्ख्या बहिणींना फूस लावून पळविले
ठळक मुद्दे२० वर्षीय व १७ वर्षीय अशा दोन मुलींना फूस लावून पळवून नेले. शोध घेतला असता, कुठेही आढळून आल्या नाहीत. अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवी कलम ३६३, ३६६ नुसार गुन्हा दाखल केला.