शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

वेगवेगळय़ा अपघातात दोन ठार

By admin | Updated: August 14, 2014 02:06 IST

कारंजा व वाशिम येथील घटना

कारंजा /वाशिम : मंगरुळपीर रस्त्यावर आदर्श अध्यापक विद्यालयाजवळ रोही आडवा आल्यामुळे तर वाशिम तालुक्यातील काटा रोडवर मोटारसायकलवरील ताबा सुटल्यामुळे या दोन अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना १३ ऑगस्ट रोजी घडली. कारंजा येथील लघु सिंचन विभाग २ कार्यालयात कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत असणारे मंगरुळपीर येथील रहिवासी बाळासाहेब श.महाकाळ हे मंगरुळपीर येथून कारंजाकडे येत असताना आदर्श अध्यापक विद्यालयाजवळ मोटारसायकलच्या रोही वन्यप्राणी आडवा आल्यामुळे त्यांचा जबर अपघात झाला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर वाशिम तालुक्यातील कोंडाळा झामरे येथील विनोद कुंडलीक इंगोले हा युवक १२ ऑगस्ट रोजी रात्रीचे वेळी मोटारसायकलने वाशिमहून आपल्या गावी परत जात होता. दरम्यान, काटा मार्गावर असलेल्या बाकलीवाल यांचे शेताजवळील त्याचा मोटारसायकलच्या स्टेअरींगवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या काठावर असलेल्या दगडावर जाऊन मोटारसायकल आदळली. या अपघातामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली. हा अपघात रात्री नेमका किती वाजता घडला, याची माहिती मिळू शकली नाही. १३ ऑगस्ट रोजी सकाळचे सुमारास एका शेतकर्‍याला अपघात होऊन इसम ठार झाल्याचे दिसून आले.