शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम, अनसिंगमधील टोकनधारक शेतक-यांची तूर खरेदी आटोपली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 22:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत २६ जुलै २०१७ पासून सुरू झालेली तूर खरेदी प्रक्रिया जिल्ह्यात यशस्वीरित्या राबविण्यात येत असून ३१ आॅगस्ट ही अंतीम मुदत असताना २६ आॅगस्ट रोजीच सहा केंद्रांपैकी वाशिम आणि अनसिंग या दोन खरेदी केंद्रांवरील तूर खरेदी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी शनिवारी दिली.३१ ...

ठळक मुद्देप्रशासनाचा पुढाकारउर्वरित केंद्रांवरीलही तूर खरेदी संपणार मुदतीत

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत २६ जुलै २०१७ पासून सुरू झालेली तूर खरेदी प्रक्रिया जिल्ह्यात यशस्वीरित्या राबविण्यात येत असून ३१ आॅगस्ट ही अंतीम मुदत असताना २६ आॅगस्ट रोजीच सहा केंद्रांपैकी वाशिम आणि अनसिंग या दोन खरेदी केंद्रांवरील तूर खरेदी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी शनिवारी दिली.३१ मे २०१७ पर्यंत जिल्ह्यातील १४ हजार ५४२ तूर उत्पादक शेतकºयांना टोकन देण्यात आले होते. त्यानुसार, २ लाख ८४ हजार ५३७ क्विंटल तूरीची नोंद झाली होती. ही तूर बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत खरेदी करण्याचे निर्देश शासनाने दिल्यावरून २६ जुलैपासून जिल्ह्यातील वाशिम, अनसिंग, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा लाड आणि रिसोड या सहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील खरेदी केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यासाठी ३१ आॅगस्ट ही अंतीम मुदत देण्यात आली होती. मात्र, त्यास आणखी ४ दिवस शिल्लक असतानाच वाशिम आणि अनसिंग या केंद्रांवरील खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली असून मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा आणि रिसोड या उर्वरित खरेदी केंद्रांवरील शिल्लक असलेली तूरही मुदतीच्या आत मोजून ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही जिल्हा उपनिबंधक कटके यांनी दिली. 

केंद्रनिहाय शिल्लक असलेली तूर
मालेगाव२७५0 क्विंटल
मंगरूळपीर११८२८ क्विंटल
कारंजा३७९२९ क्विंटल
रिसोड१७९७६ क्विंटल