शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकची दुचाकीला जबर धडक; एक जण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:42 IST

याबाबत वाशिम ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाशिमवरून हिंगोलीकडे जात असलेल्या एम.एच. १८ - बी.जी. ११५५ क्रमांकाच्या ट्रकने वाशिम-कनेरगाव मार्गावरील ...

याबाबत वाशिम ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाशिमवरून हिंगोलीकडे जात असलेल्या एम.एच. १८ - बी.जी. ११५५ क्रमांकाच्या ट्रकने वाशिम-कनेरगाव मार्गावरील सायखेडा फाट्यानजीक एम.एच. ३८ - एल. २०६८ क्रमांकाच्या दुचाकी वाहनास मागून जबर धडक दिली. या घटनेत वाहनचालक विनोद विश्वनाथ मते हे जागीच ठार झाले; तर त्यांची पत्नी सिंधूबाई यांनाही गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनच्या चमूने घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाकडे पाठविण्यात आला.

.....................

सिंधूबाईंचा आक्रोश असह्य करणारा

तपोवन (ता. सेनगाव, जि. हिंगोली) येथून तोंडगावमार्गे उकळीपेन येथे भावाच्या मुलीच्या घरी वास्तुशांतीच्या कार्यक्रमास जात असतानाच विनोद मते यांच्यावर काळाने झडप घातली. या अपघातात मते यांच्या शरीराचे तुकडेतुकडे झाले. त्यांच्या अर्धवट अवस्थेतील मृतदेहाजवळ बसून असलेल्या सिंधूबाई रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रत्येकाकडे मदतीची याचना करीत होत्या. त्यांचा हा आक्रोश असह्य करणारा होता.