शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी-गैरआदिवासी जमीन हस्तांतरण प्रकरणाची चौकशी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:28 IST

मानोरा : आदिवासींकडून गैरआदिवासी यांनी जमीन हस्तांतरण केलेल्या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी अफ्रोट या आदिवासी संघटनेने तहसीलदार यांना ...

मानोरा : आदिवासींकडून गैरआदिवासी यांनी जमीन हस्तांतरण केलेल्या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी अफ्रोट या आदिवासी संघटनेने तहसीलदार यांना १४ जुलै रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे.

राज्य सरकारने आदिवासींकरिता जमीन प्रत्यार्पणाचा १९७४ चा कायदा संमत करून आदिवासींची गैरआदिवासींना विकलेली जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ३६ व ३६ अ नुसार कायद्यात दुरुस्ती करून आदिवासींच्या जमीन खरेदी-विक्रीस निर्बंध घातले व हस्तांतरणाला बंदी असल्याबाबत ७/१२ वर नोंदीसुद्धा घेतल्या.

त्यामुळे आदिवासींची जमीन खरेदी करावयाची असल्यास राज्य शासन किंवा जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय खरेदी करू शकत नाही.

परंतु काही आदिवासींचे अज्ञान व व्यासनाधीनतेचा गैरफायदा घेऊन इतर गैरआदिवासी हे मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याशी संगनमत करून मोठ्या प्रमाणात लाच घेऊन काही लोक कायद्याविरुद्ध व्यवहार करीत आहेत, अशी तक्रार विजय मस्के यांनी आदिवासी संघटना यांच्याकडे केली आहे. अशा प्रकारची प्रकरणे मानोरा तालुक्यातील शेंदुरजना अढाव मंडळात होताना दिसतात. या प्रकरणांची चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी. तसेच गैरआदिवासींनी आदिवासींकडून खरेदी केलेल्या अनधिकृत जमिनीच्या नोंदी फेरफारमध्ये घेतल्याची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदन देते वेळी ऑर्गनायझेशन फाॅर राइट्स ऑफ ट्राइबलचे पदाधिकारी बंडू वाघमारे, चंदुभाऊ भुजाडे, आनंद खुळे, सुभाष मोरकर, मस्के महाराज, सचिन झळके, संजय गोदमले, गजानन डोलारकर, माजी मंडळ अधिकारी वाघमारे, संजय भवाळ, दिलीप अंबोरे, गोपाल लावरे उपस्थित होते.