वाशिम : पशूसंवर्धन विभागातील डॉक्टरांच्या रिक्त पदांचे ग्रहण पशूपालकांना आर्थिक संकटात ढकलत असल्याचे विदारक वास्तव समोर येत आहे. श्रेणी एक व दोनच्या दवाखान्यातील तब्बल २0 ते २३ डॉक्टर व इतर कर्मचार्यांच्या रिक्त पदांचा विपरित परिणाम जनावरांना भोगावा लागत आहे. जिल्ह्यातील श्रेणी एकचे १७ व श्रेणी दोनचे ४१ अशा एकूण ५८ पशूवैद्यकीय दवाखाना व उपचार केंद्रांमधून जनावरांना वैद्यकीय सेवा दिली जाते. २00७ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात एकूण पाच लाख ८0 हजार ९५६ पशूधन आहे. या पशूधनाचे ह्यआरोग्यह्ण सांभाळण्यासाठी श्रेणी एकच्या दवाखान्यावर एलडीओ दर्जाची २१ पदे मंजूर आहेत. यापैकी तब्बल १२ पदांचा अनुशेष आहे. श्रेणी दोनच्या दवाखान्यावरील ११ पदांना डॉक्टरांची प्रतीक्षा आहे. त्यातही पशुवैद्यकीय दवाखान्याचा कारभार पाहणारा कारभारी ह्यपदवीधरह्ण सापडत नसल्याने अनेक दवाखान्यांचा प्रभार इतरांच्या खांद्यावर देण्याची वेळ जिल्हा परिषद प्रशासनावर आली आहे. पदवीधर डॉक्टरांना शवविच्छेदन अहवाल व इतर जबाबदार प्रस्ताव, कागदपत्र, प्रमाणपत्र देण्याचा व निर्णय घेण्याचा अधिकार असतो. अनेक ठिकाणी पदवीधारक नसल्याने पशूधन विभागाला एका दिव्यातून जावे लागत आहे. जि.प. पशूसंवर्धन विभागाच्या पदाधिकार्यांनी आपल्या व्यथा शासनदरबारी पोहोचविल्या आहेत. मात्र, शासन या व्यथांवर फुंकर कधी घालते, हे एक कोडे बनत चालले आहे. रिक्त पदांबरोबरच अनेक पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये भौतिक सुविधाही नाहीत. त्यामुळे डॉक्टरांना आहे त्या सुविधेतच पशुंवर उपचार करावे लागतात. दवाखाना सुरू ठेवण्यासाठी सकाळ व सायंकाळ अशी दोन वेळा ह्यओपीडीह्णची वेळ निश्चित करण्यात आली आहे. सायंकाळच्या वेळी अनेक डॉक्टर दांडी मारत असल्याचा अनुभव पशुपालकांनी घेतला आहे. रिक्त पदे, भौतिक असुविधा आणि डॉक्टरांची दांडी पशुपालकांचा ताप वाढवित आहे.
समस्यांच्या चक्रव्यूहात अडकला पशूविभाग
By admin | Updated: May 20, 2014 22:42 IST