शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

पाणी फाउंडेशनकडून शेतीखर्चाच्या हिशोबाचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:37 IST

पाणी फाउंडेशनकडून गत दोन वर्षांपूर्वी वॉटर कप स्पर्धा राबविण्यात आली. या स्पर्धेंतर्गत जलसंधारणाची अधिकाधिक कामे करून गावे पाणीदार करण्यात ...

पाणी फाउंडेशनकडून गत दोन वर्षांपूर्वी वॉटर कप स्पर्धा राबविण्यात आली. या स्पर्धेंतर्गत जलसंधारणाची अधिकाधिक कामे करून गावे पाणीदार करण्यात आली. आता या स्पर्धेच्याच धर्तीवर शेतकरी व गावकऱ्यांच्या विकासातून गाव समृद्ध करण्यासाठी समृद्ध गाव स्पर्धा राबविली जात आहे. या स्पर्धेंत जिल्ह्यातील ५० पेक्षा अधिक गावांचा समावेश आहे. त्यात कारंजा तालुक्यातील २४ गावे आहेत. या गावांत शेतकरी व गावकऱ्यांच्या सहकार्यातून विविध कामे केली जात आहेत. यासाठी पाणी फाउंडेशनकडून प्रशिक्षणही दिले जात आहे. त्यात शेतीचा जमाखर्च ठेवण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात असून, यासाठी आवश्यक असलेल्या मोबाईल अ‍ॅपचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. कारंजा तालुक्यातील जानोरीत यासंदर्भात शुक्रवारी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.

--

जानोरीवासीयांचा प्रतिसाद

शेतीचा जमाखर्च अ‍ॅपमध्ये कसा भरावा, यासाठी जानोरीत शेतकऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. मास्टर टेक्निकल ट्रेनर सुमित गोरले यांनी उपस्थित शेतकऱ्यांना अ‍ॅप विषयी सविस्तर माहिती दिली व सोयाबीन या पिकाची माहिती व जमाखर्च शेतकऱ्यांकडून भरून घेतला. गावातील शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद आज मिळाला. अ‍ॅपमध्ये शेतीचा जमाखर्च भरणे किती सोपा असून, तो भरल्यानंतर शेतीच्या जमाखर्चाचा सारांश पाहायला मिळतो तो चकित करणारा आहे, अशा प्रतिक्रिया यावेळी शेतकऱ्यांनी दिल्या.