शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जलस्रोत शोधण्यात जातोय वेळ; जलजीवन मिशनचा बसेना मेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:45 IST

वाशिम : जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावागावात पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली जाणार आहे. याअंतर्गत प्रत्येक कुटुंबास नळजोडणी दिली जाणार ...

वाशिम : जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावागावात पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली जाणार आहे. याअंतर्गत प्रत्येक कुटुंबास नळजोडणी दिली जाणार असून, त्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध असलेले बळकट स्रोत शोधले जात आहेत. मात्र पावसाचा अडथळा आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे या प्रक्रियेतच अधिक वेळ जात असून, कामे प्रलंबित राहत आहेत.

ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी जलजीवन मिशनच्या माध्यमातून पूर्ण करावी, असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यानुषंगाने ही कामे पूर्ण करण्यासाठी तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळवून घ्यावी. पंचायत समितीनिहाय कामांचा वेळोवेळी आढावा संबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी घ्यावा. डिसेंबर २०२१ अखेर बहुतांश योजनांची कामे पूर्ण होतील, या दृष्टीने नियोजन करावे. जिल्ह्याचा समावेश आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत असल्याने ग्रामीण भागातील शाळा व अंगणवाड्यांना शुद्ध, स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे. जलजीवन मिशनअंतर्गत ‘रेट्रो फिटिंग’ची कामे वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस. यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.

प्रत्यक्षात मात्र जलजीवन मिशनअंतर्गत केली जाणारी कामे अत्यंत संथ गतीने सुरू असून, बळकट जलस्रोत शोधण्याच्या प्रक्रियेतच प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा अधिक वेळ खर्च होत आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभरात पावसाने थैमान घातल्याने कामे प्रलंबित राहत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

...............

जिल्ह्यात २१४ गाव कृती आराखडे

जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात २१४ गाव कृती आराखडे तयार करण्यात आले आहेत. चालूवर्षी प्राप्त ५ कोटींच्या निधीतून प्रगतिपथावरील २३ योजनांवर २ कोटी १५ लाख रुपये खर्च करण्यात आले. २८५ गावांमध्ये रेट्रो फिटिंगच्या माध्यमातून नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे; मात्र या कामांची गती अत्यंत संथ असल्याने कामे पूर्ण कधी होतील, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.