शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

हत्यार बाळगणारे तिघे पोलिसांच्या जाळ्यात

By admin | Updated: June 17, 2016 02:29 IST

मोटारसायकलही जप्त; आरोपी वाशिम शहरातील.

वाशिम: शस्त्र घेऊन रेल्वे स्टेशन परिसरात तीन युवक संशयास्पदरीत्या हालचाली करताना आढळून आले. या तिघांना वाशिम शहर पोलिसांनी हत्यारासह जेरबंद केल्याची घटना गुरुवारला दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. वाशिम येथील रेल्वे स्टेशन परिसरातील मोकळय़ा मैदानात तीन इसम मोटारसायकलवर क्र. एम.एच. ३७ के. ३६९१ ने हत्यार (खंजीर) घेऊन फिरत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून ठाणेदार रवींद्र देशमुख यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर ठाणेदार देशमुख यांनी पोलीस उपनिरीक्षक अमित जाधव, उमांकात केदारे, सतीश गुळदे, अमोल गिर्‍हे, गजानन कर्‍हाळे यांच्या पथकाला घटनास्थळी रवाना केले. या पथकाने संशयास्पद तिघांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे दोन खंजीर मिळून आले. यामध्ये सचिन दिलीप रसाळ (वय १८, रा. भीमनगर ) याच्या कमरेला एक खंजीर, संग्रपाल भारत कांबळे (वय १७ वर्ष रा. भीमनगर वाशिम ) याच्या कमरेला एक खंजीर, रंजीत सीताराम खरात (वय ३१ वर्ष) रा. भीमनगर वाशिम) याच्याकडे एक मोटारसायकल आढळून आली. असा अंदाजे एकूण २१ हजार २00 रुपयांचा मुद्देमाल तिघांकडून जप्त करून त्यांना अटक करण्यात आली. वाशिम जिल्हय़ात रमजान सणानिमित्त कलम ३७ (१) १३५ प्रमाणे जिल्हाधिकार्‍यांनी आदेश केला आहे. प्रतिबंधक असलेला आदेश लागू असल्याने उपरोक्त आरोपींचे कृत्य कलम ४, २५ भा.ह.का.सह ३७ (१) १३५ मु.पो. अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित जाधव करीत आहेत.