बुलडाणा : महसूल कर्मचार्र्यांच्या संपामुळे जिल्ह्यातील सुमारे ३ हजार फाईल्स सह्याविना तुंबून पडल्या आहेत. आज ७ ऑगस्ट रोजी तहसीलदारांचा संप मिटल्यामुळे आता कामाला सुरूवात झाली आहे. मात्र संपकाळातील तुंबून पडलेल्या फाईल्सचा भार प्रशासनावर आला आहे. जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील तहसीलदार आणि नायब तहसीलदार त्यांच्या विविध मागण्यासाठी मागील पाच दिवसापासून बेमुदत संपावर गेले होते. संपाच्या या काळात शासकिय कामकाज पुर्णत: ठप्प झाल्याने शेकडो फाईल्स प्रलंबीत पडल्या होत्या. जिल्ह्यात बुलडाणा, खामगाव, जळगाव जामोद, देऊळगावराजा आणि मेहकर येथे उपविभागीय कार्यालये आहेत. तर तेराही तालुक्यात सेतू केंद्र आहे. सेतू केंद्राच्या माध्यमातून तयार होत असलेले विविध प्रमाणपत्न, दाखले तयार करून उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयातील लिपीकांकडे सादर केले जातात.लिपिकांकडून अशा विविध प्रमाणपत्नांसाठी जोडलेल्या कागदपत्नांची पुर्तता झाल्याची शहानिशा केल्यानंतर त्यांची स्वाक्षरी होते व त्यानंतर ती फाईल नायब तहसीलदारांकडे वर्ग करण्यात येते. नायब तहसीलदारांच्या स्वाक्षरीनंतर अंतिम स्वाक्षरी प्रमाणपत्न देण्याची प्रक्रिया उपविभागीय अधिकारी करतात. मात्न तहसीलदार व नायब तहसीलदार हेच संपावर असल्याने दाखले व प्रमाणपत्नाच्या फाईल्स गेल्या ५ दिवसापासून सेतू केंद्रातच पडून होत्या. बुलडाणा सेतू केंद्रात दररोज जवळपास १00 केसेस बनविल्या जातात. त्यानुसार तेरा तालुक्यातील सेतू केंद्रात दररोजच्या कमी अधिक प्रमाणात ६00 ते ६५0 केसेस तयार होतात. त्यानुसार मागील ५ दिवसाच्या संपाच्या काळात जिल्हाभरात ३ हजाराच्या वर विविध प्रकरणाच्या केसेस सह्यासाठी तुंबून पडल्या आहेत. आजपासून तहसीलदारांचा संप मिटला असून तहसीलदार व नायब तहसीलदार कामावर रूजू झाले आहेत. उद्यापासून ह्या केसेसवर तहसीलदाराच्या सह्या होऊन उपविभागीय अधिकार्याकडे स्वक्षरीसाठी वर्ग करण्यात येतील. तब्बल ५ दिवस तहसील कार्यालयात कोणतेही कामे न झाल्यामुळे विद्यार्थी व पालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. या संपाच्या काळात तहसील कार्यालय ओस पडले होते. काही शिकावू कर्मचारी फाईलचा निपटारा करताना दिसत होते. मात्र आज पासून सेतू कार्यालयातून केसेस नायब तहसीलदाराकडे सह्यासाठी जाणे सुरू झाल्याने जिल्हाभरातील सेतू केंद्रावर गर्दी होती.
पाच दिवसात साचल्या तीन हजार फाईल्स
By admin | Updated: August 8, 2014 00:26 IST