वाशिम : अनसिंग येथून वाशिम शहराकडे रेशनचा तांदूळ घेऊन येणारा ट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २६ जानेवारीच्या उत्तररात्री जागमाथा चौफुलीवर पकडला. यामध्ये ३ लाख २५ हजाराचा तांदूळ आढळला असून, दोघांना अटक करण्यात आली. वाशिम जिल्ह्यामधून बाहेर जिल्ह्यात रेशनचा तांदूळ विक्रीसाठी जात असल्याची माहितीच्या आधारावर एलसीबीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकान साफळा रचुन तांदुळ घेऊन जाणार्या ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये ३ लाख २५ हजार रूपये किमतीचे तांदळाचे १६0 कट्टे आढळून आले. जप्त केलेला तांदूळ अंदाजे १३0 क्विंटल असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी अनसिंग येथील धान्याचे व्यापारी बंसीलाल मोदानी व ट्रक मालक - चालक मोहसिन खान जमील (रा.पुसद ) या दोघांना अटक केली. या दोघांविरूद्ध वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये जीवनावश्यक वस्तु कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
तीन लाखाचा रेशन तांदूळ पकडला
By admin | Updated: January 27, 2015 23:58 IST