वाशिम : किरकोळ कारण समोर करून अकरा लोकांनी संगनमत करून एका इसमाला ईल शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी २३ जून रोजी अकरा जणांविरूद्ध भादंविचे कलम १४३, २९४, ५0६ अन्वये गुन्हा दाखल केला. प्राप्त माहितीनुसार शहरामधील बिलाल नगर येथील रहिवासी असिफ खान खुश्रीद खान यांनी वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले की, शमीम बी फिरोजखा, फिरोजखा अजीज खा, आझाद खा अजीज खा, अक्रमखा वाहेदखा, शे. जाफर शे. युसूफ, नुरूल हक अब्दुल हक, फिरोजखा नजीर खा, सै. अख्तर सै. गुलाब, निसारखाँ अजिजखा व इम्रानशाँ सत्तारशा (सर्व रा. मालेगाव) व सै. शफाकत सै. इब्राहीम (रा. वाशिम) यांनी संगनमत करून किरकोळ कारणावरून ईल शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. अशा फिर्यादीवरून पोलिसांनी उपरोक्त अकरा जणांविरूद्ध भादंविचे कलम १४३, २९४, ५0६ अन्वये गुन्हा दाखल केला.
जीवे मारण्याची धमकी
By admin | Updated: June 25, 2014 01:40 IST