शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पीकविमा भरण्यास शेतकऱ्यांना तांत्रिक अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:28 IST

मंगरूळपीर : सध्या शेतकऱ्यांची पीकविमा भरण्यासाठी लगबग सुरू आहे. एक राष्ट्र एक योजना अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री पीकविमा ...

मंगरूळपीर : सध्या शेतकऱ्यांची पीकविमा भरण्यासाठी लगबग सुरू आहे. एक राष्ट्र एक योजना अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री पीकविमा योजना अंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्व्हर डाऊन असल्याने केंद्र संचालक व शेतकरी वर्ग चांगलेच हतबल झालेले दिसून येत आहे.

ही स्थिती तालुक्यात नव्हे तर सगळीकडे असू शकते, कारण ज्या वेबसाईट अंतर्गत हा विमा काढला जातो ती साइटच सध्या स्थितीत खूपच हळू काम करीत आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड व अन्य रोगांमुळे पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना मदत म्हणून सन २०१६ मध्ये प्रधानमंत्री पीकविमा योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मदतसुद्धा झाली आहे. खरीप हंगाम सुरू होताच शेतकरी वर्ग आपल्या शेतात पेरलेल्या पिकांचे विमा संरक्षण करण्याकरिता प्रधानमंत्री पीकविमा योजना अंतर्गत विमा काढतात. सन २०२१-२२ या चालू हंगामाकरिता प्रधानमंत्री पीकविमा योजना अंतर्गत पिकांचे विमा काढण्याकरिता शेतकरी ऑनलाइन केंद्रांना भेट देत आहे, परंतु त्या ठिकाणी सर्व्हर काम करीत नसल्यामुळे शेतकरी हतबल झालेला दिसत आहे. दिवसभरात मोठ्या मुश्किलीने हे एक ते दोन फॉर्म यशस्वीरित्या फिलअप होतात. वरूनच प्रॉब्लेम असल्याने शेकडो शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेले असतानासुद्धा ते फॉर्म फिलअप करता येत नाही. यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. तसेच १५ जुलै ही पीकविमा भरण्याची अंतिम तारीख असून अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा भरला नसल्याने ही तारीख वाढविण्याची गरज आहे.

-------------

तारीख वाढविण्याची मागणी

तालुक्यातील शेकडाे शेतकरी विविध अडचणींमुळे पीकविमा काढू शकले नाहीत. १५ जुलै शेवटची तारीख असून यात वाढ करण्याची मागणी शेतकरीवर्गातून केल्या जात आहे.