शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानासाठी शिक्षक आमदारांच्या दारात ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:47 IST

सर्व अघोषित, घोषित, त्रुटी, अपात्र आणि अंशत: अनुदानित शाळेतील शिक्षकांना १०० टक्के प्रचलित सूत्रानुसार अनुदान मिळणे अपेक्षित असताना, नियमानुसार ...

सर्व अघोषित, घोषित, त्रुटी, अपात्र आणि अंशत: अनुदानित शाळेतील शिक्षकांना १०० टक्के प्रचलित सूत्रानुसार अनुदान मिळणे अपेक्षित असताना, नियमानुसार अनुदान नाही. प्रचलित नियमानुसार विनाअनुदानित शाळेतील शिक्षक १०० टक्के अनुदानासाठी पात्र असताना अनेक शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षकांना २० टक्के तर काहींना ४० टक्के वेतन मिळत आहे तर, अनेक शिक्षकांना अद्याप वेतन मिळत नाही. या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाचे आमदार अ‍ॅड. किरणराव सरनाईक यांच्या वाशिम येथील सिव्हिल लाइन स्थित घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित आमदार सरनाईक देखील आंदोलनात सहभागी झाले. यावेळी पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी खासदार भावना गवळी, आमदार अमित झनक, जि. प. अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, प्राचार्य अरुण सरनाईक, विनाअनुदानित कृती समितीचे विभागीय अध्यक्ष सुधाकर वाहुरवाघ यांच्यासह कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती. या आंदोलनाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी पाठिंबा दिला.

०००००

मी शिक्षकांचा आमदार - सरनाईक

ठिय्या आंदोलनादरम्यान आमदार अ‍ॅड. किरणराव सरनाईक यांनी शिक्षकांच्या व्यथा जाणून घेतल्या. मी एक अपक्ष आमदार असल्यामुळे कुठल्याही पक्षाचा नाही. मी फक्त शिक्षकांचा आमदार असून, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या शासनदरबारी मांडून त्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी आमदार अ‍ॅड. सरनाईक यांनी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली.