शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना थकबाकी वसुलीसाठी कारवाईचे टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:27 IST

महावितरणच्या अकोला परिमंडळा अंतर्गत ३० जून पर्यंत शंभर टक्के थकबाकी वसूल करण्याची ताकीद देण्यात आली आहे. कोरोना काळात वसुली ...

महावितरणच्या अकोला परिमंडळा अंतर्गत ३० जून पर्यंत शंभर टक्के थकबाकी वसूल करण्याची ताकीद देण्यात आली आहे. कोरोना काळात वसुली ठप्प झाल्याने आर्थिक गणित कोलमडलेल्या महावितरणच्या वसुलीसाठी मुंबई कार्यालय, प्रादेशिक कार्यालयांकडून पाठपुरावा, आढावा घेण्यात येत आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेतील सर्व कर्मचाऱ्यांसाठी वसुलीची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, परिमंडलात कार्यरत असलेल्या ३,००० हजार लाईनस्टाफला थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांवर कारवाईचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांवर कारवाई होणार हे निश्चित असून, महावितरणची कटू कारवाई टाळण्यासाठी वीज ग्राहकांनी थकीत वीज बिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

------------------------------------------------

बॉक्स: ७ हजार ग्राहकांची जोडणी खंडित

अकोला परिमंडळांतर्गत अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील ५ हजारापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या विविध वर्गवारीतील ७ हजारापेक्षा जास्त थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील ३,००३ ग्राहकांचा समावेश असून, त्यांच्याकडे ५.६७ कोटीचे वीज देयके थकीत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ३,१७८ ग्राहकांनी २.७८ कोटी थकविल्याने त्यांंचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे, तर वाशिम जिल्ह्यातील १,१३७ ग्राहकांचा २.८० कोटीच्या थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

------------------------------------------------

बॉक्स: सुटीच्या दिवशीही वीज बिल भरणा केंद्र सुरू

महावितरणची वसुली मोहीम जोरदार सुरू असल्याने या मोहिमेत थकबाकीदार वीज ग्राहकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे; परंतु वीज ही अत्यावशक सेवा असल्याने ग्राहकांची गैरसोय होऊ नये व ग्राहकांना कारवाई टाळण्यासाठी थकीत वीज बिलाचा भरणा करता यावा यासाठी महावितरणची वीज बिल भरणा केंद्रे सुट्टीच्या दिवशीही उघडी ठेवण्यात आली आहे. याशिवाय वीज ग्राहकांना महावितरणचे संकेतस्थळ व महावितरण मोबाईल ॲपव्दारे ऑनलाईन वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध आहे.