निवेदनात नमूद आहे की, दोन महिन्यापासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी पूर्ण परिवारासह रस्त्यावर उतरलेले आहेत. केंद्र सरकारने जे तीन कृषी विधेयक बनवले ते मागे घ्यावेत याकरीता हे शेतकरी आंदोलन करीत आहेत , याची दखल घेऊन हे कृषी विधेयक तत्काळ मागे घ्यावे व आंदोलनकारी शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली. वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा नगराध्यक्षा डॉ. गझाला खान यांच्या मार्गदर्शनाखाली सदर निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष समाधान भगत , तालुका अध्यक्ष गजानन इंगोले, रमेश राठोड,संतोष लांभाडे, राष्ट्रपाल इंगळे,कटके, अजरभाई, ॲड. मारुफ खान आदींची उपस्थिती होती.
दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला वंचित आघाडीचे समर्थन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:23 IST