---------------
लाभार्थींचे घरकुल अनुदान रखडले
मेडशी : लॉकडाऊनपूर्वी रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल बांधकाम पूर्ण करणाऱ्या काही लाभार्थींना मंगळवार २ फेब्रुवारीपर्यंतही लाभार्थीना घरकुलाचे अनुदान मिळाले नाही. याची दखल जिल्हा प्रशासनाने घेण्याची मागणी जि.प. आणि पं.स. सदस्यांसह लाभार्थींकडून करण्यात आली आहे.
^^^^
पाण्याचा अपव्यय
शिरपूर : परिसरातील अडोळ येथील अडाण प्रकल्पातून अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपूर्वी पाणीपुरवठा योजनेंतर्गतच्या व्हॉल्वला गळती लागल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
------------
वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान
कामरगाव : परिसरात सध्या रब्बी पिके डौलदार असून, हरिण, माकड आदी वन्यप्राणी पिकांत धुमाकूळ घालत असल्याने पिकांचे नुकसान होत असल्याचे २ फेब्रुवारी रोजी दिसून आले. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली.
^^^^^^^^^^
प्रकल्पांवरील झुडपांची कापणी
वाशिम : जिल्ह्यातील विविध प्रकल्पांची दुरुस्ती प्रलंबित असतानाच या प्रकल्पाच्या भिंतीवर मोठमोठे वृक्ष वाढले असून, झाडांच्या मूळ खोलवर जाऊन प्रकल्पाच्या भिंतीला धोका उद्भवण्याची भीती आहे. पाटबंधारे विभागाने त्याची दखल घेत झुडपे तोडण्यासह प्रकल्पाची तात्पुरती दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
===Photopath===
020221\02wsm_2_02022021_35.jpg
===Caption===
मधूमक्षिका पालनासाठी धडपड