शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचा-यांची लेखणी बंद

By admin | Updated: April 13, 2016 01:19 IST

वाशिम जिल्ह्यातील कर्मचा-यांची प्रलंबित मागण्या निकाली काढण्याची मागणी.

वाशिम: प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्हाभरातील महसूल कर्मचार्‍यांनी १२ एप्रिल रोजी लेखणी बंद आंदोलन केले. नायब तहसीलदारांचा ग्रेड पे ४ हजार ३00 रुपयांवरून ४ हजार ६00 रुपये करणे, महसूल लिपिकांचे पदनाम बदलून महसूल सहायक करणे, कोतवालांना चतुर्थश्रेणी दर्जा देणे, शिपायांना सायकलऐवजी मोटारसायकल अग्रीम मान्य करणे, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती देणे, नायब तहसीलदार संवर्गातील सर्व पदे पदोन्नतीने भरणे या प्रमुख सहा मागण्या ६ ऑगस्ट २0१५ रोजी मान्य करण्यात आल्या होत्या. याबाबतचा शासननिर्णयही लवकरच निघेल, असे आश्‍वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांनी दिले होते; मात्र अद्यापपर्यंतही याबाबत ठोस निर्णय झाला नाही. परिणामी, महसूल कर्मचार्‍यांच्या प्रमुख मागण्या शासनदरबारी ह्यजैसे थेह्ण आहेत. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही काहीच तोडगा निघत नसल्याचे पाहून १0 मार्चपासून महसूल कर्मचारी संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. १0 मार्च रोजी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतरही शासन ठोस निर्णय घेत नसल्याचे पाहून २२ मार्चला काळ्या फिती लावून महसूल कर्मचार्‍यांनी कामकाज केले. याउपरही शासन दखल घेत नसल्याचे पाहून आंदोलनाचा चौथा टप्पा म्हणून १२ एप्रिल रोजी जिल्ह्यातील महसूल कर्मचार्‍यांनी लेखणी बंद आंदोलन केले. सर्व कर्मचार्‍यांनी कार्यालयात उपस्थित राहून लेखणी बंद ठेवली. वाशिम तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय यासह रिसोड, मालेगाव, कारंजा, मानोरा व मंगरुळपीर तहसील कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या लेखणी बंद आंदोलनाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला. लेखणी बंद आंदोलनामुळे महसूल विभागाचे कामकाज दिवसभरासाठी ठप्प होते.