शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बचत गटाच्या वस्तू प्रदर्शनाला प्रारंभ

By admin | Updated: March 25, 2017 02:26 IST

मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन; जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले मार्गदर्शन.

वाशिम, दि. २४- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने आयोजित महिला बचत गटांनी निर्मित केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी थाटात करण्यात आले. यावेळी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण झाल्याशिवाय सामाजिक व राजकीय सक्षमीकरण होणे शक्य नाही. त्यामुळे महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी बचत गटाची चळवळ व्यापक करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख ह्या होत्या. जि. प. चे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, समाजकल्याण सभापती पानुताई जाधव, कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्‍वनाथ सानप, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे संचालक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के. एम. अहमद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे, श्रीमती वानखेडे, वाशिम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी महिला सक्षमीकरणावर मार्मिक भाष्य केले. कायद्याच्या बडग्यामुळे महिलांचा राजकीय क्षेत्रात शिरकाव झाला खरा पण, तो केवळ नामधारी स्वरूपाचा. अनेक महिलांचा कारभार त्यांचे पती अथवा वडील पाहताना निदर्शनास येत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी उद्घाटनप्रसंगी मनोगत व्यक्त केले. महिलांच्या विकासासाठी त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत उभारण्यात आलेली दुकाने सध्या बंद पडली आहेत. काही ठिकाणी नादुरुस्त आहेत. ते दुरुस्त करुन महिलांना उपलब्ध करुन दिल्यास महिलांना रोजगाराची संधी निर्माण होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. लोणचे, पापड, कुरडई आदि पारंपरिक व्यवसाय सोडून महिलांनी कुक्कुट पालन, बकरीपालन असे नवीन व्यवसाय सुरु करण्याचे आवाहन त्यांनी केले. सभापती विश्‍वनाथ सानप यांनीही यावेळी विचार मांडले. हर्षदा देशमुख यांनी अध्यक्षीय समारोप केला. महिलांनी आर्थिक सूत्रे आपल्या हातात घेतल्यास महिला सक्षमीकरणासह कौटुंबिक समतोलही राखला जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे संचालक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के. एम. अहमद यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधीक्षक मुकुंद नायक यांनी मानले.