वाशिम : शहरामध्ये १६ एप्रिल रोजी सकाळपासून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम सुरू झाल्याबरोबर अनेकांनी स्वत:हून आपले अतिक्रमण हटविले. शहरामध्ये मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणो वाढली असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. शहरा तील जांभरूण नावजी फाटा ते लाखाळा परिसरातील अतिक्रमण पहिल्या दिवशी हटवून मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. अतिक्रमण हटविताना प्रोफेसर कॉलनीतील एका अतिक्रमणधारकाने आपले मत मांडण्याचा प्रयत्न केला; मात्र पथकाने कोणताही वाद न करता सामंजस्याने प्रकरण निवळले. अतिक्रमण हटाव मोहिमेत नगर परिषद मुख्याधिकारी वसंत इंगोले तसेच पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसील कार्यालय, वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांच्या प थकाचा समावेश होता. शहरातील पुसद नाका ते रेल्वेगेट परिसरातील अतिक्रमणावर १७ एप्रिल रोजी गजराज चालणार आहे. अचानक आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेची शहरातील अतिक्रमणधारकांनी धास्ती घेतले आहे.
अतिक्रमण हटाव मोहिमेस प्रारंभ
By admin | Updated: April 17, 2015 01:45 IST